नीतिसूत्रे 1:1-5
नीतिसूत्रे 1:1-5 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
इस्राएलाचा राजा, दावीदाचा पुत्र शलमोन, याची ही नितीसूत्रे. ज्ञान व शिक्षण शिकावे, बुद्धीच्या वचनाचे ज्ञान मिळवावे, सुज्ञतेचे शिक्षण घेऊन जे योग्य, न्यायी, आणि चांगले ते करण्यास शिकावे, भोळ्यांना शहाणपण आणि तरुणांना ज्ञान व दूरदर्शीपणा द्यावे, ज्ञानी व्यक्तीने ऐकावे आणि त्याने ज्ञानात वाढावे, बुद्धीमान व्यक्तीला मार्गदर्शन मिळावे
नीतिसूत्रे 1:1-5 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
इस्राएलचा राजा दावीदाचा पुत्र शलोमोनाची नीतिसूत्रे: सुज्ञान आणि शिक्षण मिळविण्यासाठी; अंतर्ज्ञानाचे शब्द समजून घेण्यासाठी; समंजसपणाने शिक्षणाचा स्वीकार करण्यासाठी, जे योग्य आहे आणि न्याय्य आणि वाजवी आहे ते करण्यासाठी; जे साधे भोळे आहेत त्यांना समंजसपणा देण्यासाठी, तरुणांना ज्ञान आणि विवेकबुद्धी देण्यासाठी— शहाण्यांनी ऐकावे आणि त्यांचे ज्ञान वाढवावे, आणि विवेकी मनुष्याला मार्गदर्शन मिळावे
नीतिसूत्रे 1:1-5 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
इस्राएलाचा राजा दावीदपुत्र शलमोन ह्याची नीतिसूत्रे : ज्ञान व शिक्षण ही संपादण्यात यावीत; बोधमय वचनांचे परीक्षण करण्यात यावे; सुज्ञतेच्या व्यवहाराचे शिक्षण, नीतिशिक्षण, न्याय व सात्त्विकपण ही प्राप्त करून घेण्यात यावीत. भोळ्यांना चातुर्य, तरुणाला ज्ञान व चाणाक्षपण प्राप्त करून द्यावे; ज्ञानी पुरुषाने ऐकावे, त्याचे ज्ञान वाढावे; बुद्धिमानाने सुविचार प्राप्त करून घ्यावा