फिलिप्पैकरांस पत्र 3:20-21
फिलिप्पैकरांस पत्र 3:20-21 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहे; तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा येणार आहे, त्याची आपण वाट पाहत आहोत; ज्या सामर्थ्याने तो सर्वकाही आपल्या स्वाधीन करण्यास समर्थ आहे त्या सामर्थ्याने तो तुमचेआमचे नीचावस्थेतील शरीर स्वत:च्या गौरवावस्थेतील शरीरासारखे व्हावे म्हणून त्याचे रूपांतर करील.
फिलिप्पैकरांस पत्र 3:20-21 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहे; तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा येणार आहे; त्याची आपण वाट पाहत आहोत. ज्या सामर्थ्याने तो सर्वकाही आपल्या स्वाधीन करण्यास समर्थ आहे त्या सामर्थ्यांने तो तुमचे आमचे नीच स्थितीचे शरीर आपल्या गौरवीच्या शरीरासारखे व्हावे म्हणून त्यांचे रूपांतर करील.
फिलिप्पैकरांस पत्र 3:20-21 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
परंतु आपले नागरिकत्व तर स्वर्गीय आहे आणि तेथून आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्त यांच्या परतण्याची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत. जे त्या सामर्थ्याद्वारे सर्वकाही त्यांच्या नियंत्रणात ठेवण्यास समर्थ आहे, ते आपली अशक्त शरीरे घेऊन व त्यांचे रूपांतर करून ती स्वतःच्या शरीरासारखी गौरवशाली शरीरे करतील.
फिलिप्पैकरांस पत्र 3:20-21 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
आपले नागरिकत्व मात्र स्वर्गात आहे, तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा आपला तारणारा येणार आहे, त्याची आपण वाट पाहत आहोत. ज्या सामर्थ्याने तो सर्व काही स्वतःच्या स्वाधीन करण्यास समर्थ आहे, त्या सामर्थ्याने तो तुमचेआमचे दैन्यावस्थेतील शरीर त्याच्या स्वतःच्या गौरवावस्थेतील शरीरासारखे व्हावे म्हणून त्याचे रूपांतर करील.