फिलिप्पैकरांस पत्र 2:19-24
फिलिप्पैकरांस पत्र 2:19-24 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
प्रभू येशूमध्ये मी आशा करतो की, लवकरच मी तीमथ्याला तुमच्याकडे पाठवेन म्हणजे, तुम्हा विषयीच्या गोष्टी जाणून माझे समाधान होईल. कारण तुमच्या विषयीच्या गोष्टीची खरी काळजी करील असा, दुसरा कोणी समान वृतीचा माझ्याजवळ नाही; कारण, सगळे स्वतःच्याच गोष्टी पाहतात, ख्रिस्त येशूच्या पाहत नाहीत. पण तुम्ही त्याचे शील हे जाणता की, जसा मुलगा पित्याबरोबर सेवा करतो, तशी त्याने शुभवर्तमानासाठी माझ्याबरोबर सेवा केली. म्हणून माझे काय होईल ते दिसून येताच, त्यास रवाना करता येईल अशी मी आशा करतो. पण मीही स्वतः लवकरच येईन असा प्रभूमध्ये मला विश्वास आहे.
फिलिप्पैकरांस पत्र 2:19-24 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मला प्रभू येशूंमध्ये आशा आहे की, मी लवकरच तीमथ्याला तुमच्याकडे पाठवीन; म्हणजे तुमची बातमी ऐकून मीही उल्हासित होईन. तुमचा खरा हितचिंतक तीमथ्यासारखा दुसरा कोणी नाही. इतर प्रत्येकजण स्वतःच्या फायद्याच्या गोष्टी पाहतात, येशू ख्रिस्ताच्या नाही. शुभवार्तेच्या कार्यात तीमथ्याने मला जसा पुत्र आपल्या पित्यास करतो, तसे साहाय्य करून स्वतःस सिद्ध केले हे तुम्हाला माहीत आहे. माझ्या सर्वगोष्टी व्यवस्थित होताच, त्याला तुमच्याकडे लवकर पाठविता येईल अशी मला आशा आहे; आणि मीही स्वतः लवकर येईन, असा प्रभुवर माझा भरवसा आहे.
फिलिप्पैकरांस पत्र 2:19-24 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तुमच्यासंबंधीच्या गोष्टी ऐकून मलाही धीर यावा म्हणून तीमथ्याला मी तुमच्याकडे लवकर पाठवीन अशी मला प्रभू येशूमध्ये आशा आहे. तुमच्या बाबींसंबंधी खरी काळजी करील असा दुसरा कोणी समान वृत्तीचा माझ्याजवळ नाही. कारण सर्व जण स्वतःच्याच गोष्टी पाहत असतात, ख्रिस्त येशूच्या पाहत नसतात; पण त्याचे शील तुम्हांला माहीत आहे की, जसा मुलगा बापाची सेवा करतो तशी त्याने सुवार्तेसाठी माझ्याबरोबर सेवा केली आहे. म्हणून माझे काय होणार आहे हे समजताच त्याला रवाना करता येईल अशी मला आशा आहे. तरी प्रभूमध्ये मला भरवसा आहे की, मीही स्वतः लवकर येईन.
फिलिप्पैकरांस पत्र 2:19-24 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
तुमच्यासंबंधीच्या गोष्टी ऐकून मलाही धीर यावा म्हणून तीमथ्यला मी तुमच्याकडे पाठवावे म्हणून मी प्रभूमध्ये आशा बाळगून आहे. तुमच्या हिताचा प्रामाणिकपणे विचार करील असा त्याच्यासारखा माझ्याकडे दुसरा कोणी नाही. इतर सर्व जण स्वतःच्याच गोष्टी पाहत असतात, ख्रिस्त येशूच्या पाहत नसतात, तीमथ्यचे महत्त्व तुम्हांला माहीत आहे की, जसा मुलगा त्याच्या वडिलांबरोबर सेवा करतो तशी आम्ही शुभवर्तमानासाठी एकत्रित सेवा केली आहे. माझे काय होणार आहे, हे समजताच त्याला रवाना करता येईल, अशी मला आशा आहे. तसेच प्रभूवर माझा भरवसा आहे की, मीही स्वतः लवकर तुमच्याकडे येईन.