फिलेमोन 1:17-19
फिलेमोन 1:17-19 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
म्हणून जर तू मला आपला भागीदार समजतोस, तर तो मीच आहे असे मानून त्याचा स्वीकार कर. त्याने तुझे काही नुकसान केले असेल किंवा तो तुझे काही देणे लागत असेल तर ते माझ्या हिशोबी मांड. मी पौल हे स्वहस्ते लिहित आहे; मी स्वतः त्याची फेड करीन. शिवाय तू स्वतःच माझे ऋण आहेस, पण याचा उल्लेख मी करीत नाही.
फिलेमोन 1:17-19 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
यास्तव जर तू मला भागीदार समजत असशील, तर जसे तू माझे स्वागत केले असते, तसेच त्याचे कर. जर त्याने काही अयोग्य कृत्य केले असेल अथवा तो तुझा कर्जदार असेल तर ते मूल्य माझ्या हिशोबी मांड. हे, मी पौल, माझ्या स्वतःच्या हातांनी लिहित आहे. मी त्याची परतफेड करेन—वास्तविक तू स्वतः माझा ॠणी आहेस, परंतु मी त्याचा उल्लेख करणार नाही.
फिलेमोन 1:17-19 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
म्हणून जर तू मला आपला भागीदार समजतोस, तर तो मीच आहे असे मानून त्याचा अंगीकार कर. त्याने तुझे काही नुकसान केले असले किंवा तो तुझे काही देणे लागत असेल तर ते माझ्या खाती मांड. हा माझा पौलाचा स्वदस्तुरचा लेख आहे; ते मी फेडीन; शिवाय तू स्वतःच माझे ऋण आहेस, पण हे मी तुला म्हणत नाही.
फिलेमोन 1:17-19 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
म्हणून जर तू मला आपला भागीदार समजतोस, तर तो मीच आहे असे मानून त्याचा अंगीकार कर. त्याने तुझे काही नुकसान केले असेल किंवा तो तुझे काही देणे लागत असेल, तर ते माझ्या खाती मांड. हे मी, पौलाने स्वतः लिहिले आहे. मी तुझी परतफेड करीन. माझे तुझ्यावर किती उपकार आहेत, ह्याविषयी मी काही बोलत नाही.