YouVersion लोगो
सर्च आयकॉन

गणना 35:1-8

गणना 35:1-8 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

परमेश्वर मोशेशी बोलला. हे मवाबामधील यार्देनाच्या खोऱ्यात यरीहोसमोर यार्देन नदीजवळ घडले. परमेश्वर म्हणाला, इस्राएल लोकांस सांग की, त्यांनी त्यांच्या वतनातील काही नगरे लेवी लोकांस द्यावी. इस्राएल लोकांनी काही नगरे आणि त्याच्या आजूबाजूची कुरणे लेवी लोकांस द्यावी. लेवी लोक त्या नगरात राहतील आणि लेवी लोकांची कुरणे गाईबैल आणि शेरडेमेंढरे इत्यादी जनावरांसाठी असावीत. आणि नगराची जी कुरणे लेव्यांना जी गायराने द्याल ती हजार हात सभोवार असावी. नगरांच्या तटबंदी बाहेर पूर्व बाजूस दोन हजार हात, दोन हजार हात दक्षिणेला, दोन हजार हात पश्चिमेला आणि दोन हजार हात उत्तर बाजूस मोजावे. नगर मध्ये असावे. त्यापैकी सहा शहरे शरणपुरे असतील. जर एखाद्या मनुष्याने चुकून कुणाला मारले तर तो मनुष्य संरक्षणासाठी त्या शहरात जाऊ शकतो. त्या सहा शहरांखेरीज आणखी बेचाळीस नगरे तुम्ही लेवींना द्या. म्हणजे तुम्ही एकूण अठ्ठेचाळीस नगरे लेवींना द्या. त्या शहरांभोवतालची जमीनही तुम्ही लेवींना द्या. इस्राएलाच्या मोठ्या कुटुंबांना वतनाचे मोठे तुकडे मिळतील आणि लहान वतनातून कमी अशी द्यावीत. प्रत्येक वंशाने आपआपल्या वतनाच्या मानाने लेव्यांना नगरे द्यावी.

सामायिक करा
गणना 35 वाचा

गणना 35:1-8 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

परमेश्वर मवाबाच्या मैदानात यरीहोसमोर यार्देनेतीरी मोशेला म्हणाला, “इस्राएल लोकांना अशी आज्ञा कर की, तुम्ही आपल्या ताब्यात मिळणार्‍या वतनातून लेव्यांना राहण्यासाठी नगरे द्यावीत आणि त्या नगरांच्या आसपासची शिवारेही त्यांना द्यावीत. नगरे त्यांच्या वस्तीसाठी असावीत आणि शिवारे त्यांची गुरेढोरे, शेरडेमेंढरे आणि त्यांच्या सर्व जनावरांसाठी असावीत. लेव्यांना जी शिवारे द्याल ती नगराच्या तटाबाहेर दक्षिण बाजूस दोन हजार हात सभोवार असावीत. आणि नगराच्या बाहेर पूर्व बाजूस दोन हजार हात, दक्षिण बाजूस दोन हजार हात, पश्‍चिम बाजूस दोन हजार हात, उत्तर बाजूस दोन हजार हात मोजावेत आणि नगर मध्ये असावे, हेच त्यांच्या नगराचे शिवार असावे. लेव्यांना जी नगरे द्याल त्यांपैकी सहा शरणपुरे असावीत, मनुष्यवध करणार्‍यांना तेथे पळून जाऊ द्यावे; त्या सहांखेरीज आणखी बेचाळीस नगरे त्यांना द्यावीत. अशी एकंदर अठ्ठेचाळीस नगरे व त्यांची शिवारे लेव्यांना द्यावीत. इस्राएल लोकांच्या वतनातून जी नगरे लेव्यांना द्यायची ती मोठ्या वतनातून अधिक व लहान वतनातून कमी अशी द्यावीत; प्रत्येक वंशाने आपापल्या वतनाच्या मानाने लेव्यांना नगरे द्यावीत.”

सामायिक करा
गणना 35 वाचा