गणना 33:50-56
गणना 33:50-56 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि मवाबाच्या मैदानामध्ये यार्देनेपाशी यरीहोजवळ परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला, इस्राएल लोकांशी बोल, त्यांना या गोष्टी सांग, तुम्ही यार्देन नदी पार कराल. तुम्ही कनान देशात जाल. तिथे जे लोक तुम्हास आढळतील त्यांना देशातून घालवा. तेव्हा तुम्ही त्यांच्या कोरीव पुतळयांचा आणि मूर्तीचा नाश करा. त्यांच्या उंचावरच्या पुजेच्या ठिकाणांचा नाश करा. तुम्ही तो प्रदेश घ्या आणि तिथेच रहा. कारण मी हा देश तुम्हास वतन करून दिला आहे. तुमच्यातील प्रत्येक कुळाने चिठ्ठ्या टाकून देश वतन करून घ्या. मोठ्या कुळाला जमिनीचा मोठा भाग मिळेल. लहान कुळाला लहान भाग मिळेल. एखाद्या ठिकाणासाठी ज्याच्या नावाची चिठ्ठी निघेल ते त्याचे वतन होईल. आपआपल्या वाडवडिलांच्या वंशाप्रमाणे तुम्हास वतन मिळेल. परंतु तुम्ही आपणापुढून त्या देशात राहणाऱ्यांना बाहेर घालवले नाही जर तुम्ही त्यांना तिथेच राहू दिले तर ते तुम्हास डोळ्यातील कुसळासारखे तुमच्या कुशीत काट्यासारखे बोचतील. तुम्ही ज्या देशात रहाल त्या देशात ते अनेक संकटे आणतील. मी तुमच्याबाबत काय करणार आहे ते मी तुम्हास दाखवले आहे. आणि जर तुम्ही त्यांना त्या देशात राहू दिले तर मी ते सर्व तुमच्याबाबतीत करीन.
गणना 33:50-56 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मवाबाच्या मैदानात यरीहोजवळ यार्देन नदीतीरी परमेश्वर मोशेला म्हणाला, “इस्राएल लोकांना सांग की, तुम्ही यार्देन ओलांडून कनान देशात पोहचाल, तेव्हा त्या देशातील सर्व रहिवाशांना तुमच्यासमोरून घालवून द्या; आकृती कोरलेल्या त्यांच्या दगडांचा नाश करा आणि त्यांची उच्च स्थाने पाडून टाका; तुम्ही तो देश ताब्यात घेऊन त्यात वस्ती करा; तुम्ही त्या देशाचे वतनदार व्हावे म्हणून मी तो तुम्हांला दिलेला आहे. तुम्ही तो देश चिठ्ठ्या टाकून आपापल्या कुळांप्रमाणे वाटून घ्यावा; मोठ्या वंशाला मोठा भाग द्यावा आणि लहान वंशाला लहान भाग द्यावा; एखाद्या ठिकाणासाठी ज्याच्या नावाची चिठ्ठी निघेल ते त्याचे वतन होईल; आपापल्या वाडवडिलांच्या वंशाप्रमाणे तुम्हांला वतन मिळावे; पण तुम्ही त्या देशातल्या रहिवाशांना तुमच्यासमोरून घालवून न दिल्यास ज्यांना तुम्ही तेथे राहू द्याल ते तुमच्या डोळ्यांना कुसळासारखे आणि तुमच्या कुशीला काट्यांसारखे होतील, आणि तुम्ही वस्ती कराल त्या देशात तुम्हांला त्रास देतील. असे झाल्यास मी जसे त्यांचे करायचे योजले आहे तसे तुमचेच करीन.”