YouVersion लोगो
सर्च आयकॉन

गणना 33:1-49

गणना 33:1-49 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

मोशे आणि अहरोन ह्यांच्या नेतृत्वाखाली इस्राएल लोक सैन्याप्रमाणे मिसर देशामधून टोळ्यांनी बाहेर पडले. तेव्हा त्यांचे मुक्काम झाले ते हे आहेत. परमेश्वराने आज्ञा केल्याप्रमाणे ते कोठून निघाले ते कोठे गेले. त्यांच्या मजला त्यांच्या मुक्कामाप्रमाणे मोशेने लिहिल्या त्या या. पहिल्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी त्यांनी रामसेस सोडले. वल्हांडणाच्या दुसऱ्या दिवशी इस्राएलचे लोक विजयोत्सवात हात वर करून बाहेर पडले. मिसर देशाच्या सगळ्या लोकांनी त्यांना पाहिले. मिसर देशाचे लोक परमेश्वराने मारलेल्या लोकांचे दफन करीत होते. ते त्यांच्या पहिल्या मुलांचे दफन करीत होते. परमेश्वराने मिसर देशाच्या देवतांना कडक शासन केले. इस्राएल लोकांनी रामसेस सोडले आणि ते सुक्कोथाला गेले. ते सुक्कोथाहून एथामाला गेले. लोकांनी तेथे रानाच्या काठावर तंबू दिले. त्यांनी एथाम सोडले आणि ते पीहहीरोथला गेले. ते बआल-सफोन जवळ होते. लोकांनी मिग्दोलासमोर तंबू दिले. मग लोकांनी पीहहीरोथहून कूच करून आणि ते समुद्र ओलांडून रानात गेले. आणि एथाम रानात तीन दिवसाची मजल करून त्यांनी मारा येथे तळ दिला. लोकांनी मारा सोडले व ते एलिमाला जाऊन राहिले. तिथे बारा पाण्याचे झरे होते आणि सत्तर खजुराची झाडे होती. लोकांनी एलिम सोडले व त्यांनी तांबड्या समुद्राजवळ तंबू दिले. त्यांनी तांबडा समुद्र सोडला आणि सीन रानात तळ दिला. सीन रान सोडून ते दफका येथे तळ दिला. लोकांनी दफका सोडले व ते आलूश येथे राहिले. लोकांनी आलूश सोडले व रफीदिमला तळ दिला. त्या जागी पिण्यासाठी पाणी नव्हते. लोकांनी रफीदिम सोडले व त्यांनी सीनाय रानात तळ दिला. त्यांनी सीनाय वाळवंट सोडले व किब्रोथ-हत्तव्वा येथे तळ दिला. किब्रोथ-हत्तव्वा येथून ते हसेरोथला राहिले. हसेरोथ येथून त्यांनी रिथमाला तंबू दिला. रिथमा सोडून ते रिम्मोन-पेरेसला आले. रिम्मोन-पेरेस सोडल्यावर त्यांनी लिब्नाला तळ दिला. लोकांनी लिब्ना सोडले व रिस्सा येथे तळ दिला. रिस्सा सोडून ते कहेलाथा येथे तळ दिला. लोकांनी कहेलाथा सोडले व त्यांनी शेफेर पर्वतावर तंबू ठोकले. शेफेर पर्वत सोडून लोक हरादांत आले. लोकांनी हरादा सोडले व मकहेलोथ येथे तळ दिला. मकहेलोथ सोडून ते तहथाला आले. लोकांनी तहथा सोडले व ते तारहला आले. तारह सोडून त्यांनी मिथकाला तळ दिला. लोकांनी मिथका सोडले व हशमोना येथे तंबू दिला. हशमोना सोडून ते मोसेरोथला आले. त्यांनी मोसेरोथ सोडले व बनेयाकानाला तळ दिला. बनेयाकान सोडून ते होर-हागिदगादला आले. होर-हागिदगाद सोडून त्यांनी याटबाथाला तंबू ठोकले. याटबाथा येथून ते अब्रोनाला आले. अब्रोनाहून त्यांनी एसयोन-गेबेर येथे तळ दिला. लोकांनी एसयोन-गेबेर सोडले व त्यांनी त्सीन रानात कादेश येथे तंबू दिला. लोकांनी कादेश सोडले व त्यांनी होरला तंबू ठोकले. अदोम देशाच्या सीमेवरील हा एक पर्वत होता. याजक अहरोनाने परमेश्वराची आज्ञा पाळली व तो होर पर्वतावर गेला. अहरोन त्याजागी मरण पावला. हा इस्राएल लोकांनी मिसर देश सोडल्याचा चाळीसाव्या वर्षाच्या पाचव्या महिन्याचा पहिला दिवस होता. अहरोन होर पर्वतावर मेला तेव्हा तो एकशे तेवीस वर्षाचा होता. कनान देशातील नेगेब जवळ अराद शहर होते. अराद येथे असलेल्या कनानी राजाने इस्राएलचे लोक येत असल्याबद्दल ऐकले. लोकांनी होर पर्वत सोडला व सलमोनाला तंबू दिला. त्यांनी सलमोना सोडले व ते पूनोनला आले. पूनोन सोडून त्यांनी ओबोथाला तळ दिला. लोकांनी ओबोथ सोडले व ते इये-अबारीमाला आले. हे मवाब देशाच्या सीमेवर होते. मग ईयीमाहून (इये-अबारिम) ते दीबोन-गादला आले. लोकांनी दीबोन-गाद सोडले व अलमोन-दिलाथाईमाला आले. अलमोन-दिलाथाईमहून त्यांनी नबोजवळच्या अबारीम पर्वतावर तंबू दिला. लोकांनी अबारीम पर्वत सोडला व ते यार्देन खोऱ्यातल्या मवाब येथे आले. हे यरीहोच्या समोर यार्देन नदीजवळ होते. त्यांनी मवाबाच्या मैदानात यार्देनतीरी त्यांचे तंबू बेथ-यशिमोथापासून आबेल-शिट्टीमापर्यंत होते.

सामायिक करा
गणना 33 वाचा

गणना 33:1-49 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

मोशे व अहरोन ह्यांच्या नेतृत्वाखाली इस्राएल लोकांच्या ज्या सेना मिसर देशातून बाहेर पडल्या त्यांच्या मजला ह्याप्रमाणे : परमेश्वराच्या आज्ञेवरून त्यांनी कूच केले त्याप्रमाणे त्यांच्या मजला मोशेने नोंदल्या त्या ह्या : पहिल्या महिन्यात म्हणजे पहिल्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी त्यांनी रामसेस येथून कूच केले; वल्हांडणाच्या दुसर्‍या दिवशी इस्राएल लोक सर्व मिसरी लोकांच्या देखत जयघोष करत बाहेर पडले; त्या वेळी मिसरी लोक परमेश्वराने ठार केलेल्या आपल्या ज्येष्ठ पुत्रांना मूठमाती देत होते; त्यांच्या देवांनाही परमेश्वराने शासन केले होते. इस्राएल लोकांनी रामसेस येथून कूच करून सुक्कोथ येथे तळ दिला. सुक्कोथ येथून कूच करून रानाच्या कडेवरच्या एथामात त्यांनी तळ दिला. एथामाहून कूच केल्यावर ते मागे फिरले व बाल-सफोनासमोरील पी-हहीरोथ येथे येऊन मिगदोलासमोर त्यांनी तळ दिला. मग ते पी-हहीरोथाहून कूच करून समुद्र ओलांडून रानात गेले आणि एथाम रानात तीन दिवसांची मजल करून मारा येथे त्यांनी तळ दिला. मारा येथून कूच करून ते एलिमाला गेले; एलीम येथे पाण्याचे बारा झरे आणि खजुरीची सत्तर झाडे होती; तेथे त्यांनी तळ दिला. एलिमाहून कूच करून तांबड्या समुद्राच्या किनार्‍यावर त्यांनी तळ दिला. तांबड्या समुद्रापासून कूच करून त्सीन रानात त्यांनी तळ दिला. त्सीन रानातून कूच करून त्यांनी दफका येथे तळ दिला. दफका येथून कूच करून त्यांनी आलूश येथे तळ दिला. आलूशाहून कूच करून त्यांनी रफीदिमात तळ दिला; तेथे लोकांना प्यायला पाणी नव्हते. रफीदिमाहून कूच करून त्यांनी सीनाय रानात तळ दिला. सीनाय रानातून कूच करून त्यांनी किब्रोथ-हत्तव्वा येथे तळ दिला. किब्रोथ-हत्तव्वा येथून कूच करून हसेरोथ येथे त्यांनी तळ दिला. हसेरोथ येथून कूच करून रिथमा येथे त्यांनी तळ दिला. रिथमा येथून कूच करून त्यांनी रिम्मोन-पेरेस येथे तळ दिला. रिम्मोन-पेरेस येथून कूच करून त्यांनी लिब्ना येथे तळ दिला. लिब्ना येथून कूच करून त्यांनी रिस्सा येथे तळ दिला. रिस्सा येथून कूच करून त्यांनी कहेलाथा येथे तळ दिला. कहेलाथा येथून कूच करून त्यांनी शेफेर डोंगराजवळ तळ दिला. शेफेर डोंगराजवळून कूच करून त्यांनी हरादा येथे तळ दिला. हरादा येथून कूच करून त्यांनी मकहेलोथ येथे तळ दिला. मकहेलोथ येथून कूच करून त्यांनी तहथ येथे तळ दिला. तहथाहून कूच करून त्यांनी तारह येथे तळ दिला. तारहाहून कूच करून त्यांनी मिथका येथे तळ दिला. मिथका येथून कूच करून त्यांनी हशमोना येथे तळ दिला. हशमोना येथून कूच करून त्यांनी मोसेरोथ येथे तळ दिला. मोसेरोथाहून कूच करून त्यांनी बनेयाकान येथे तळ दिला. बनेयाकानाहून कूच करून त्यांनी होर-हागिदगाद येथे तळ दिला. होर-हागिदगादाहून कूच करून त्यांनी याटबाथा येथे तळ दिला. याटबाथा येथून कूच करून त्यांनी अब्रोना येथे तळ दिला. अब्रोना येथून कूच करून त्यांनी एसयोन-गेबेर येथे तळ दिला. एसयोन-गेबेराहून कूच करून त्यांनी त्सीन रान म्हणजे कादेश येथे तळ दिला. कादेशाहून कूच करून त्यांनी अदोम देशाच्या सीमेवरील होर पर्वताजवळ तळ दिला. इस्राएल लोक मिसर देशातून निघाल्यापासून चाळिसाव्या वर्षाच्या पाचव्या महिन्याच्या प्रतिपदेस अहरोन याजक परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे होर पर्वतावर गेला आणि तेथे मृत्यू पावला. अहरोन होर पर्वतावर मृत्यू पावला तेव्हा तो एकशे तेवीस वर्षांचा होता. कनानातील नेगेबात राहणार्‍या अरादाच्या कनानी राजाने तेव्हा इस्राएल लोक आल्याची बातमी ऐकली. मग होर पर्वतापासून कूच करून त्यांनी सलमोना येथे तळ दिला. सलमोना येथून कूच करून त्यांनी पूनोन येथे तळ दिला. पूनोनाहून कूच करून त्यांनी ओबोथ येथे तळ दिला. ओबोथाहून कूच करून त्यांनी मवाबाच्या सीमेवरील ईये-अबारीम येथे तळ दिला. मग ईयीमाहून कूच करून त्यांनी दीबोन-गाद येथे तळ दिला. दीबोन-गादाहून कूच करून त्यांनी अलमोन-दिबलाथाईम येथे तळ दिला. अलमोन-दिबलाथाइमाहून कूच करून त्यांनी नबोसमोरील अबारीम डोंगरात तळ दिला. अबारीम डोंगरांपासून कूच करून त्यांनी मवाबाच्या मैदानात यरीहोजवळ यार्देनेतीरी तळ दिला. मवाबाच्या मैदानात यार्देनेतीरी बेथ-यशिमोथापासून आबेल-शिट्टिमापर्यंत त्यांनी तळ दिला.

सामायिक करा
गणना 33 वाचा