गणना 27:15-21
गणना 27:15-21 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मोशे परमेश्वराशी बोलला व म्हणाला, परमेश्वर सर्व मानवजातीच्या आत्म्यांचा देव याने एका मनुष्यास मंडळीवर नेमून ठेवावे. तो त्यांच्यापुढे बाहेर जाईल व त्यांच्यापुढे आत येईल. तो त्यांना बाहेर नेईल व आत आणील म्हणजे परमेश्वराची मंडळी मेंढपाळ नसलेल्या मेंढरासारखी होणार नाही. तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला, नूनाचा मुलगा यहोशवा ह्याला घेऊन त्याच्यावर आपला हात ठेव, त्याच्याठायी माझा आत्मा राहतो. त्यास याजक एलाजार आणि सर्व मंडळीसमोर उभे करून आणि त्यास त्यांच्या समक्ष आज्ञा कर. तू आपला काही अधिकार त्यास दे. याकरिता की, इस्राएलाच्या सर्व मंडळीने त्याची आज्ञा मानावी. तो एलाजार याजकापुढे उभा राहील, तो त्याच्यावतीने उरीमाच्या निर्णयासाठी परमेश्वरास विचारील. त्याने व त्याच्याबरोबर इस्राएलाच्या सर्व लोकांनी त्याच्या सांगण्यावरून बाहेर जावे व आत यावे.
गणना 27:15-21 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मोशे परमेश्वराला म्हणाला, “सर्व देहधारी आत्म्यांचा देव जो परमेश्वर त्याने ह्या मंडळीवर एका पुरुषाची नेमणूक करावी; तो त्यांच्यापुढे बाहेर जाईल व त्यांच्यापुढे आत येईल; तो त्यांना बाहेर नेईल व त्यांना आत आणील. असे केले तर परमेश्वराची मंडळी मेंढपाळ नसलेल्या शेरडा-मेंढरांप्रमाणे होणार नाही.” तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला, “नूनाचा मुलगा यहोशवा ह्याला घेऊन त्याच्यावर आपला हात ठेव; त्याच्या ठायी माझा आत्मा वसत आहे. एलाजार याजक व सर्व मंडळी ह्यांच्यासमोर त्याला उभे करून त्यांच्यादेखत त्याला अधिकारारूढ कर. आपला काही अधिकार त्याला दे; म्हणजे इस्राएल लोकांची सारी मंडळी त्याचे मानील. तो एलाजार याजकापुढे उभा राहील आणि एलाजार त्याच्या वतीने उरीमाच्या निर्णयासाठी परमेश्वराला विचारील; यहोशवाच्या आज्ञेप्रमाणे सर्व मंडळी म्हणजे तो स्वतः व त्याच्यासहित सर्व इस्राएल लोक पुढे जातील आणि त्याच्या आज्ञेप्रमाणे मागे येतील.”