YouVersion लोगो
सर्च आयकॉन

गणना 21:8-35

गणना 21:8-35 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

परमेश्वर मोशेला म्हणाला, “आग्या सापाची एक प्रतिमा करून झेंड्याच्या खांबावर टांग म्हणजे सर्पदंश झालेल्या कोणा माणसाने त्याच्याकडे पाहिले तर तो जगेल.” मग मोशेने पितळेचा एक साप बनवून टांगला, तेव्हा सर्पदंश झालेल्या कोणी त्या पितळेच्या सापाकडे पाहिले म्हणजे तो जगे. नंतर इस्राएल लोकांनी कूच करून ओबोथ येथे तळ दिला. ओबोथाहून कूच करून उगवतीकडे मवाबासमोरील रानात ईये-अबारीम येथे त्यांनी तळ दिला. तेथून कूच करून त्यांनी जेरेद खोर्‍यात तळ दिला. तेथून निघून त्यांनी रानातून वाहणारी, अमोर्‍यांच्या सीमेवरून वाहणारी जी आर्णोन नदी तिच्या पैलतीरी तळ दिला. ही आर्णोन नदी मबाव देशाची सरहद्द आहे. ती मवाबी व अमोरी ह्यांच्यामधील सरहद्दीवरून वाहते. ह्यामुळे ‘परमेश्वराचे संग्राम’ नावाच्या ग्रंथात येणेप्रमाणे लिहिले आहे : “सुफातला वाहेब, व आर्णोनेची खोरी आणि आर येथील वस्तीपर्यंत व मवाबाच्या सरहद्दीपर्यंत पसरत गेलेली त्या खोर्‍यांची उतरण.” तेथून कूच करून ते बएर (म्हणजे विहीर) येथे गेले. ज्या विहिरीविषयी परमेश्वराने मोशेला सांगितले होते की, ‘लोकांना एकत्र कर म्हणजे मी त्यांना पाणी देईन’ तीच ही विहीर. त्या समयी इस्राएलाने हे गीत गाइले : “हे विहिरी, उसळून ये; तिला उद्देशून गा. राजदंडाने1 व आपल्या काठ्यांनी सरदारांनी ही विहीर खणली इस्राएलातील अमिरांनी ती खोदली.” मग ते रानातून मत्तनाला गेले; आणि मत्तनाहून नाहालीयेलास आणि नाहालीयेलाहून बामोथास गेले; आणि बामोथाहून कूच करून रानापुढील (येशीमोनापुढील) पिसगाच्या माथ्याजवळ असलेल्या मवाबाच्या मैदानातील खोर्‍याकडे ते जाऊन पोहचले. मग इस्राएलाने अमोर्‍यांचा राजा सीहोन ह्याला जासुदांच्या हाती सांगून पाठवले की, “आम्हांला तुझ्या देशातून पलीकडे जाऊ दे. आम्ही आजूबाजूला वळून कोणत्याही शेतात किंवा द्राक्षमळ्यात पाऊल टाकणार नाही किंवा विहिरीचे पाणी पिणार नाही, आणि तुझ्या हद्दीतून बाहेर पडेपर्यंत आम्ही केवळ राजमार्गानेच जाऊ.” पण सीहोनाने इस्राएलास आपल्या देशातून जाऊ दिले नाही. आपले सर्व लोक जमा करून इस्राएलाशी सामना करण्यासाठी तो निघाला आणि रानाकडे आला; त्याने याहस येथे येऊन इस्राएलाशी लढाई केली. तेव्हा इस्राएलाने त्याच्यावर तलवार चालवली आणि आर्णोनेपासून अम्मोनी लोकांच्या सरहद्दीवरील यब्बोक नदीपर्यंत त्याचा देश काबीज केला; परंतु अम्मोनी लोकांची सरहद्द मजबूत होती. ह्याप्रमाणे इस्राएलाने अमोर्‍यांची ही सर्व नगरे घेतली. अमोर्‍यांच्या सर्व नगरांत म्हणजे हेशबोनात व आसपासच्या गावांत इस्राएल वस्ती करून राहिला. हेशबोन हे अमोर्‍यांचा राजा सीहोन ह्याचे नगर होते; त्याने मवाबाच्या पूर्वीच्या राजाशी लढाई करून आर्णोनेपर्यंतचा त्याचा सर्व देश काबीज केला होता. ह्यावरून शाहीर गातात की, “हेशबोनाला या; सीहोनाचे नगर बांधू द्या, त्याची स्थापना होऊ द्या; कारण हेशबोनातून अग्नी निघाला आहे. सीहोनाच्या नगरातून ज्वाला निघाली आहे; तिने मवाबाचे आर, आणि आर्णोनेच्या गढ्यांचे स्वामी भस्म करून टाकले आहेत. हे मवाबा! तू हायहाय करशील; कमोशाचे लोकहो तुम्ही नष्ट झालात, त्याने आपल्या मुलांना पळपुटे होऊ दिले, आणि आपल्या कन्या अमोर्‍यांचा राजा सीहोन ह्याच्या बंदीत पडू दिल्या आहेत. आम्ही त्यांना बाण मारले आहेत; दीबोनापर्यंत हेशबोनाचा नाश झाला आहे, आणि नोफापर्यंत सर्व देश आम्ही उजाड केल्यावर मेदबापर्यंत आग पसरली आहे.” ह्याप्रमाणे इस्राएल लोक अमोर्‍यांच्या देशात वस्ती करून राहिले. मग मोशेने याजेर नगराचा भेद काढण्यासाठी हेर पाठवले; इस्राएल लोकांनी त्याच्या आसपासची गावे हस्तगत करून तेथल्या अमोर्‍यांना देशाबाहेर हाकून लावले. नंतर तेथून वळून ते बाशानाच्या वाटेने जाऊ लागले, तेव्हा बाशानाचा राजा ओग त्यांच्याशी सामना करायला आपले सर्व लोक घेऊन निघाला आणि एद्रई येथे युद्धास उभा राहिला. पण परमेश्वर मोशेला म्हणाला, “त्याला भिऊ नकोस, कारण मी त्याला, त्याच्या सर्व लोकांना व त्याच्या देशाला तुझ्या हाती दिले आहे. हेशबोनात राहणारा अमोर्‍यांचा राजा सीहोन ह्याचे जसे तू केलेस तसेच ह्याचेही कर.” मग त्यांनी त्याला, त्याच्या मुलांना व सर्व प्रजेला असा मार दिला की त्याचे कोणीच उरले नाही आणि त्यांनी त्याचा देश काबीज केला.

सामायिक करा
गणना 21 वाचा

गणना 21:8-35 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

परमेश्वर मोशेला म्हणाला, एक पितळेचा साप कर आणि तो खांबावर ठेव. साप चावल्यानंतर जर एखाद्याने खांबावरच्या पितळेच्या सापाकडे पाहिले तर तो मनुष्य मरणार नाही. मोशेने परमेश्वराची आज्ञा पाळली त्याने पितळेचा साप बनवला व तो खांबावर ठेवला. नंतर जेव्हा जेव्हा एखाद्या साप चावलेल्या मनुष्याने त्या खांबावरच्या पितळेच्या सापाकडे पाहिले तेव्हा तो जिवंत राहिला. इस्राएल लोक तो प्रदेश सोडून ओबोथ येथे आले. नंतर ओबोथ सोडून त्यांनी ईये-अबारीमाला मवाबाच्या पूर्वेकडे रानात तळ दिला. तो सोडून ते जेरेद खोऱ्यात आले व तिथे तळ दिला. ते तेथूनही निघाले आणि आर्णोन नदीत्या पैलतीरावरच्या वाळवंटात त्यांनी तळ दिला. या नदीचा उगम आमोऱ्याच्या सरहद्दीवर आहे. या नदीचे खोरे हीच मवाब आणि अमोरी यांची सरहद्द होती. म्हणून परमेश्वराचे युद्ध या पुस्तकात पुढील शब्द लिहिले आहेत, सुफातला वाहेब व आर्णोनाची खोरी, त्या खोऱ्याची उतरण आर शहराकडे वळते, आणि मवाबाच्या सरहद्दीपर्यंत खाली जाते. तेथपासून ते बैर येथे प्रवास करीत गेले. ज्या विहिरीविषयी परमेश्वराने मोशेला सांगितले होते तीच ही विहिर आहे, “माझ्यासाठी लोकांस एकत्र जमव म्हणजे मी त्यांना पाणी देईन.” नंतर इस्राएली हे गाणे गाइलेः विहिर, उसळून ये. त्या संबंधी गाणे गा. आमच्या सरदारांनी विहीर खणली, सरदारांनी ही विहीर खणली. त्यांच्या राजदंडानी व आपल्या काठ्यांनी विहीर खणली, मग त्यांनी अरण्यापासून ते मत्तानापर्यंत प्रवास केला. लोक मत्तानाहून नाहालीयेलला गेले. नंतर ते नाहीलयेलासहून बामोथाला गेले. लोक बामोथाहून मवाबाच्या खोऱ्यात गेले. या जागी पिसगा पर्वताच्या उंच माथा वाळवंटाकडे जातो. पिसगा पर्वताच्या उंच माथ्यावरुन वाळवंट दिसते. इस्राएल लोकांनी काही माणसे अमोऱ्याचा राजा सीहोन याच्याकडे पाठवली. ते राजास म्हणाले, “आम्हास तुमच्या देशातून जाण्याची परवानगी द्या. आम्ही कोणत्याही शेतातून वा द्राक्षाच्या मळयातून जाणार नाही. आम्ही तुमच्या कोणत्याही विहिरीचे पाणी पिणार नाही. आम्ही केवळ राजामार्गवरुनच जाऊ.” पण सीहोन राजाने इस्राएल लोकांस त्याच्या देशातून जाण्याची परवानगी दिली नाही. राजाने आपले सैन्य गोळा केले आणि तो रानाकडे कूच करीत निघाला. तो इस्राएल लोकांबरोबर युद्ध करण्यासाठी निघाला होता. याहसला राजाच्या सैन्याने इस्राएल लोकांशी युद्ध केले. पण इस्राएलानी त्याच्यावर तलवार चालविली. नंतर त्यांनी आर्णोन आणि यब्बोक नद्यांच्या मधला प्रदेश घेतला. त्यांनी अम्मोनी लोकांच्या सरहद्दीपर्यंतचा प्रदेश घेतला, ते त्या सरहद्दीवर थांबले कारण अम्मोनी लोक तिचे रक्षण करीत होते. इस्राएल लोकांनी सगळी अमोऱ्यांची शहरे घेतली आणि तिथे रहायला सुरुवात केली. त्यांनी हेशबोन शहराचा व आजूबाजूच्या लहान शहरांचाही पराभव केला. हेशबोनामध्ये अमोऱ्यांचा राजा सीहोन राहत होता. पूर्वी सीहोनाने मवाबाच्या राजाशी युद्ध केले होते. सीहोनाने आर्णोन नदीपर्यंतचा प्रदेश घेतला होता. यावरुन ते म्हणीमध्ये बोलतात; ते म्हणतात, हेशबोनाला या. पुन्हा सीहोनाचे शहर बांधू द्या, त्याची स्थापना होऊ द्या. हेशबोनामधून आग निघाली आहे, ज्वाला सीहोनाच्या शहरातून निघाली आहे. त्या आगीत मवाबामधले आर शहर बेचीराख झाले. आणि आर्णोनेच्या गढ्याचे स्वामी भस्म करून टाकले आहेत. हे मवाबा! तू हायहाय करशील, कमोशाचे लोक नष्ट झाले. त्याची मुले पळून गेली. त्याच्या मुलींना अमोऱ्याचा राजा सीहोन याने कैद करून पकडून नेले. पण आम्ही सीहोन जिंकले आहे. दीबोनापर्यंत हेशबोन सर्व नष्ट झाले आहे. आम्ही नोफा जे मेदबाजवळ पोहचते तेथपर्यंत त्यांचा सर्व पराभव केला आहे. याप्रमाणे इस्राएल लोक अमोऱ्यांच्या देशात राहू लागले. मग मोशेने याजेर शहर बघण्यासाठी काही लोकांस पाठवले. त्यांनी त्यातली गावे हस्तगत करून घेतली आणि जे अमोरी लोक तेथे होते त्यांना घालवून दिले. नंतर इस्राएल लोक बाशानाच्या रस्त्याला लागले. बाशानाचा राजा ओग याने त्याचे सैन्य घेतले व तो इस्राएल लोकांशी लढावयास निघाला. तो त्यांच्याबरोबर एद्रई येथे लढला. तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला, “त्याला भिऊ नकोस. कारण मी तुला त्याच्यावर, त्याच्या सर्व सैन्यावर आणि त्याच्या देशावर विजय दिला आहे. तू हेशबोनमध्ये राहणाऱ्या अमोऱ्यांचा राजा सीहोन ह्याचे जे केलेस तेच याचेही कर.” तेव्हा त्यांनी त्याला, त्याच्या मुलांना आणि त्याच्या सर्व सैन्याला, इतके मारले की, त्याच्या लोकांपैकी कोणी जिवंत उरला नाही. मग त्यांनी त्यांचा सर्व प्रदेश घेतला.

सामायिक करा
गणना 21 वाचा

गणना 21:8-35 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

तेव्हा याहवेहने मोशेला म्हटले, “सापाची एक प्रतिमा तयार कर आणि ती एका खांबावर टांग; ज्याला साप चावेल त्या व्यक्तीने खांबावर टांगलेल्या सापाकडे पाहिल्यास तो जगेल.” तेव्हा मोशेने कास्याचा साप तयार केला व तो खांबावर टांगला, तेव्हा ज्या कोणाला साप चावला व त्यांनी त्या कास्याच्या सापाकडे पाहिले म्हणजे ते जगत असत. इस्राएली लोक प्रवास करीत पुढे निघाले आणि ओबोथ येथे तिथे त्यांनी तळ दिला. नंतर ते ओबोथहून निघाले व पूर्वेकडे मोआबासमोर ईये-अबारीम रानात त्यांनी तळ दिला. तिथून निघून त्यांनी जेरेद खोर्‍यात तळ दिला. नंतर तिथून निघून, अमोर्‍यांच्या रानातील सीमेतून निघणाऱ्या आर्णोन नदीजवळ त्यांनी तळ दिला. आर्णोन नदी मोआबाची सीमा आहे, जी मोआब आणि अमोरी यांच्यामध्ये आहे. यावरून याहवेहच्या युद्धाच्या पुस्तकात म्हटले आहे: “…सूफाहतील वाहेब व आर्णोनाचे ओहोळ आणि ओहोळांचा जो ओघ आर येथील वस्तीकडे वाहतो आणि मोआब प्रदेशालगत आहे.” तिथून ते बैर म्हणजे विहीर या ठिकाणाकडे निघाले. ज्या ठिकाणी याहवेह मोशेला म्हणाले होते, “लोकांना बोलव म्हणजे मी त्यांना पाणी देईन.” मग इस्राएलने हे गीत गाईले: “हे विहिरी, उफाळून ये! त्याविषयी गा, जी विहीर राजपुत्रांनी खोदली, की ज्यामध्ये लोकांचे सरदार— आपल्या राजदंड आणि काठीसह बुडले.” मग ते त्या रानातून मत्तानाहला गेले, मत्तानाहहून नाहालीयेल, नाहालीयेलपासून बामोथास, आणि बामोथपासून मोआबामधील खोर्‍यापर्यंत जिथे पिसगाच्या शिखरावर ओसाड जमीन दिसते. इस्राएलने अमोर्‍यांचा राजा सीहोनकडे दूत पाठवून म्हटले: “आम्हाला तुझ्या देशामधून जाऊ दे. आम्ही शेताकडे किंवा द्राक्षमळ्याकडे वळणार नाही किंवा विहिरीतील पाणी पिणार नाही. तुमची सीमा पार करेपर्यंत आम्ही केवळ राजमार्गानेच प्रवास करू.” परंतु सीहोन राजाने इस्राएलास त्याच्या सीमेमधून जाण्यास परवानगी दिली नाही. त्याने आपल्या संपूर्ण सैन्याला जमा केले व इस्राएला विरुद्ध बाहेर रानात गेला आणि याहस येथे पोहोचल्यावर तो इस्राएलाशी लढला. परंतु इस्राएलने त्याला तलवारीवर धरले आणि आर्णोन नदीपासून यब्बोक नदीपर्यंत, अम्मोनी लोक राहतात तिथपर्यंत त्यांच्या देशावर कब्जा केला, कारण त्यांची सीमा तटबंदची होती. याप्रकारे इस्राएलने हेशबोन व आसपासच्या नगरांसह अमोर्‍यांची सर्व नगरे ताब्यात घेतली व त्यात वस्ती केली. हेशबोन हे अमोर्‍यांचा राजा सीहोनचे शहर होते, ज्याने मोआबाच्या पूर्वीच्या राजाशी युद्ध केले होते आणि आर्णोन पर्यंतचा सर्व प्रदेश त्याच्याकडून घेतला होता. म्हणूनच कवी म्हणतात: “हेशबोनला या आणि ते पुन्हा बांधू द्या; सीहोनाच्या शहराची पुनर्स्थापना होऊ द्या. “हेशबोनमधून अग्नी निघाला, सीहोनाच्या शहरातून ज्वाला निघाली. त्याने मोआबचे आर या आर्णोनाच्या उंच प्रदेशातील नागरिकांना भस्म केले आहे. हे मोआबा, तुझा धिक्कार असो! कमोशाच्या लोकांनो, तुम्ही नष्ट झाला आहात! त्याने आपल्या मुलांना निर्वासित केले व अमोर्‍यांचा राजा सीहोनच्या हाती आपल्या मुलींना बंदी म्हणून दिले. “पण आम्ही त्यांना पराजित केले आहे; दिबोनपर्यंत हेशबोनचे वर्चस्व नष्ट झाले आहे. मेदबापर्यंत पसरलेल्या नोफाहपर्यंत, आम्ही त्यांचा नाश केला आहे.” याप्रमाणे इस्राएली अमोरी लोकांच्या देशात स्थायिक झाले. मोशेने याजेर नगराकडे हेर पाठवल्यानंतर, इस्राएली लोकांनी तेथील आसपासच्या वसाहती हस्तगत केल्या आणि तिथे असलेल्या अमोरी लोकांना बाहेर घालवून दिले. नंतर तिथून वळून ते बाशानाच्या वाटेने वर गेले आणि बाशानचा राजा ओग आणि त्याचे सर्व सैन्य जमवून त्यांच्याशी युद्ध करण्यासाठी एद्रेई येथे गेले. याहवेहने मोशेला म्हटले, “त्याला भिऊ नकोस, कारण मी त्याला व त्याच्या सर्व सैन्याला तुझ्या हाती दिले आहे. अमोर्‍यांचा राजा सीहोन जो हेशबोनात राज्य करीत होता, याचे तू जसे केले तसेच याला कर.” तेव्हा इस्राएली लोकांनी त्याला, त्याची मुले व सर्व सैन्यासह नष्ट करून टाकले, त्यांच्यातील कोणीही वाचला नाही आणि इस्राएली लोकांनी त्याचा देश ताब्यात घेतला.