गणना 15:37-41
गणना 15:37-41 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला इस्राएली वंशजाशी बोल आणि त्यांना आज्ञा कर की, त्यांनी पिढयानपिढया आपल्या वस्त्राच्या टोकांना गोंडे लावावे आणि प्रत्येक टोकाच्या गोंड्यावर एक निळा दोरा बांधा. या गोंड्याचा उद्देश असा की, ते बघून परमेश्वराने दिलेल्या सगळ्या आज्ञा लक्षात ठेवाल व आज्ञा पाळाल. तुमचे हृदय व तुमची दृष्टी ज्यांच्यामागे जाऊन तुम्ही व्यभिचारी होत असा, त्याच्यामागे तुम्ही जाऊ नये. “माझ्या सगळ्या आज्ञा पाळायच्या आहेत हे तुम्ही लक्षात ठेवावे. आपल्या देवाकरता पवित्र व्हावे. मी तुमचा देव परमेश्वर आहे. तुम्हास मिसर देशातून आणणारा मीच आहे. तुमचा देव होण्यासाठी मी हे केले. मीच तुमचा देव परमेश्वर आहे.”
गणना 15:37-41 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
परमेश्वर मोशेला म्हणाला, “इस्राएल लोकांना आज्ञा कर की, त्यांनी पिढ्यानपिढ्या आपल्या वस्त्राच्या काठांना गोंडे लावावेत, आणि प्रत्येक काठाच्या गोंड्यावर निळी फीत लावावी. ह्या गोंड्यांचा उद्देश असा की, ते तुमच्या नजरेस पडून परमेश्वराच्या सगळ्या आज्ञांचे तुम्हांला स्मरण व्हावे व तुम्ही त्या पाळाव्यात; आपल्या मनास येईल तसे तुम्ही व्यभिचारी मतीने वागत आलात तसे वागू नये; तर तुम्ही सर्व आज्ञांची आठवण ठेवून त्या पाळाव्यात व आपल्या देवाप्रीत्यर्थ पवित्र व्हावे. तुमचा देव व्हावे म्हणून ज्याने तुम्हांला मिसर देशातून बाहेर आणले तोच मी परमेश्वर तुमचा देव आहे; मी परमेश्वर तुमचा देव आहे.”