YouVersion लोगो
सर्च आयकॉन

नहेम्या 6:1-4

नहेम्या 6:1-4 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

आता जेव्हा मी भिंत बांधल्याचे सनबल्लट, तोबीया, गेशेम हा अरब आणि आमचे इतर शत्रू यांनी असे ऐकले की, भिंतीतली भगदाडे मी बुजवली पण वेशीचे दरवाजे अजून बसवले गेले नव्हते, तेव्हा सनबल्लट आणि गेशेम यांनी मला असा निरोप पाठवला की, “नहेम्या, ये. आपण एकमेकांना ओनोच्या मैदानातल्या एखाद्या गावात एकत्र भेटू.” पण त्यांचा हेतू मला इजा करण्याचा होता. तेव्हा मी माझ्या निरोप्यांमार्फत असा निरोप पाठवला की, “एका महत्वाच्या कामात असल्यामुळे मी खाली येऊ शकत नाही. तुम्हास भेटायला आल्यामुळे काम थांबावे असे मला वाटत नाही.” सनबल्लट आणि गेशेम यांनी हाच निरोप माझ्याकडे चार वेळा पाठवला. आणि मी ही त्यांना प्रत्येक वेळी हेच उत्तर पाठवले.

सामायिक करा
नहेम्या 6 वाचा

नहेम्या 6:1-4 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

सनबल्लट, तोबीयाह, गेशेम अरबी आणि आमच्या इतर शत्रूंना समजले की मी तट बांधण्याचे काम अंदाजे पूर्ण केले आहे व एकही भेग बाकी राहिली नाही—खरेतर वेशींना दरवाजे लावण्याचेच काम राहिलेले होते, तेव्हा सनबल्लट व गेशेम यांनी मला असा निरोप पाठविला, “ये, आपण ओनोच्या मैदानातील एका खेडेगावात भेटू या.” पण ते मला दुखापत करण्याचा कट करीत असल्याचे मला समजले, म्हणून मी त्यांच्याकडे उलट हा निरोप पाठविला: “मी एक महान कार्य करीत आहे; ते कार्य थांबवून मी तुमच्या भेटीला का यावे?” त्यांनी चार वेळा मला तो निरोप पाठविला आणि प्रत्येक वेळी मी तेच उत्तर दिले.

सामायिक करा
नहेम्या 6 वाचा

नहेम्या 6:1-4 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

मी कोट बांधण्याचे संपवले आणि कोटाला कोठे तुटफूट राहू दिली नाही. वेशीचे दरवाजे मात्र अद्यापि लावले नव्हते; हे सनबल्लट, तोबीया, गेशेम अरबी व आमचे वरकड शत्रू ह्यांनी ऐकले. तेव्हा सनबल्लट व गेशेम ह्यांनी मला सांगून पाठवले की, “चल, आपण ओनोच्या मैदानातील एखाद्या खेड्यात एकमेकांना भेटू;” पण मला काहीतरी दगा करण्याचा त्यांचा हेतू होता. हे पाहून मी जासूद पाठवून त्यांना कळवले की, “मी मोठ्या कामात गुंतलो आहे; मला यायला सवड नाही; मी काम सोडून तुमच्याकडे का यावे, काम का बंद पाडावे?” त्यांनी चार वेळा माझ्याकडे हाच निरोप पाठवला आणि मीही त्यांना असेच उत्तर दिले.

सामायिक करा
नहेम्या 6 वाचा