नहेम्या 10:28-29
नहेम्या 10:28-29 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
उरलेल्या लोकांनी जे याजक, लेवी द्वारपाळ गायक व मंदिरात काम करणारे लोक आणि देवाचे नियमशास्त्र पाळायची शपथ घेऊन देशोदेशीच्या लोकांतून जे वेगळे झाले होते त्या सर्वांना, ज्यास बुद्धी व समजूत होती अशा स्त्रीयां, पुत्र व कन्या यासह वेगळे झाले. त्याचबरोबर त्यांच्या सर्व स्त्रिया, आणि सावधानपणे ऐकू शकतील आणि समजू शकतील असे त्यांचे सर्व पुत्र आणि कन्या. या सर्व लोकांनी आपले बांधव आणि महत्वाच्या व्यक्तीसमवेत परमेश्वर देवाचे जे नियमशास्त्र देवाचा सेवक मोशे याच्याकडून दिले होते ते पाळण्याची शपथ घेतली. आणि जर आपण देवाचे हे नियमशास्त्र पाळले नाही तर आपल्यावर अरिष्टे कोसळण्यासंबंधीचा शापही त्यांनी स्विकारला.
नहेम्या 10:28-29 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
अवशिष्ट लोकांनी म्हणजे याजक, लेवी, द्वारपाळ, गायक व नथीनीम ह्यांनी आणि देवाचे नियमशास्त्र पाळण्यासाठी देशोदेशीच्या लोकांतून जे वेगळे झाले होते त्या सर्वांनी ज्यांना अक्कल व समज होती अशा आपल्या स्त्रिया, पुत्र व कन्या ह्यांच्यासह आपले भाऊबंद व महाजन ह्यांच्याशी एकचित्त होऊन आणभाक केली की जे नियमशास्त्र देवाचा सेवक मोशे ह्याच्या द्वारे देण्यात आले त्याप्रमाणे आम्ही वागू आणि आमचा प्रभू परमेश्वर ह्याच्या सर्व आज्ञा, निर्णय व नियम लक्षपूर्वक पाळू; असे न केल्यास आम्हांला शाप लागो.