नहेम्या 1:3-11
नहेम्या 1:3-11 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
त्यांनी मला सांगितले, “बंदिवासातले जे अवशिष्ट लोक त्या प्रांतात राहिले ते मोठ्या दुर्दशेत असून त्यांची अप्रतिष्ठा होत आहे; यरुशलेमेचा तटही पडला आहे, व त्याच्या वेशी आग लावून जाळून टाकल्या आहेत.” हे ऐकताच मी खाली बसून रडू लागलो आणि बरेच दिवसपर्यंत विलाप करीत राहिलो; मी उपास करून स्वर्गींच्या देवाची प्रार्थना केली की, “हे स्वर्गीच्या देवा, परमेश्वरा, हे थोर व भयावह देवा, तुझ्यावर प्रीती करणारे व तुझ्या आज्ञा पाळणारे ह्यांच्यासंबंधाने तू आपला करार पाळतोस व त्यांच्यावर करुणा करतोस; तुझे सेवक इस्राएल लोक ह्यांच्यासाठी मी तुझा दास ह्या वेळी रात्रंदिवस प्रार्थना करीत आहे; ती कान देऊन ऐक व डोळे उघडून पाहा; आम्ही इस्राएल लोकांनी तुझ्याविरुद्ध पातके केली आहेत, ती मी कबूल करतो; मी व माझ्या बापाच्या घराण्याने पातक केले आहे. आम्ही तुझ्यासमोर अतिशय दुर्वर्तन केले आहे आणि तू आपला सेवक मोशे ह्याला विहित केलेल्या आज्ञा, नियम व निर्णय आम्ही पाळले नाहीत. तू आपला सेवक मोशे ह्याला जे सांगितले होते त्याचे स्मरण कर; ते हे की, ‘तुम्ही पातक केल्यास मी तुम्हांला राष्ट्रांमध्ये विखरीन; पण तुम्ही माझ्याकडे वळलात व माझ्या आज्ञा मानून त्याप्रमाणे चाललात तर तुमचे परागंदा झालेले लोक दिगंती असले तरी तेथून त्यांना एकत्र करून मी आपल्या नामाच्या निवासार्थ निवडलेल्या स्थानी आणीन.’ पाहा, हे तुझे सेवक व तुझे लोक आहेत, त्यांना तू आपल्या महासामर्थ्याने व प्रबल हस्ताने सोडवले आहेस. हे प्रभू, मी विनवणी करतो की तू आपल्या ह्या सेवकाच्या प्रार्थनेकडे व जे तुझे सेवक तुझ्या नामाचे भय बाळगण्यास उत्सुक आहेत त्यांच्या प्रार्थनेकडे कान दे. तुझ्या सेवकास आज यश दे आणि ह्या मनुष्याची त्याच्यावर कृपादृष्टी होईल असे कर.” (ह्या वेळी मी राजाचा प्यालेबरदार होतो.)
नहेम्या 1:3-11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
त्यांनी मला सांगितले, “बंदिवासातून सुटका होऊन प्रांतात राहणारे हे लोक मोठ्या बिकट परिस्थितीत आहेत आणि त्यांची अप्रतिष्ठा होत आहे, कारण यरूशलेमची तटबंदी कोसळून पडली आहे आणि तसेच तिच्या वेशी जळून खाक झाल्या आहेत.” आणि हे ऐकताच मी खाली बसलो व रडू लागलो आणि कित्येक दिवस मी शोक व उपवास केला आणि स्वर्गीय देवापुढे प्रार्थना केली. मी म्हणालो, हे परमेश्वरा, स्वर्गातील देवा, तू महान व भयप्रद देव आहेस. तुझ्यावर प्रीती करणाऱ्या आणि तुझ्या आज्ञांचे पालन करणाऱ्या लोकांशी केलेला आपला करार पाळतोस व त्यांजवर करुणा करतोस. तुझा सेवक अहोरात्र तुझी प्रार्थना करत आहे, ती तू कृपाकरून डोळे उघडून पाहा आणि कान देऊन ऐक, तुझ्या सेवकांच्या म्हणजेच इस्राएलाच्या वतीने मी प्रार्थना करत आहे. आम्ही इस्राएल लोकांनी तुझ्याविरुध्द जी पापे केली आहेत, ती मी कबुल करतो की, मी व माझ्या वडीलांच्या घराण्याने पाप केले आहे. आम्ही तुझ्या विरूद्ध अतिशय वाईट वर्तन केले आहे. तुझा सेवक मोशे याला तू दिलेल्या आज्ञा, शिकवण आणि नियम यांचे पालन आम्ही केले नाही. कृपया तुझा सेवक मोशे याला सांगितलेले वचन तू आठव. त्यास तू म्हणाला होतास, “जर तुम्ही अविश्वासू राहिलात तर मी तुम्हास दुसऱ्या राष्ट्रांमध्ये पांगवून टाकीन, पण तुम्ही माझ्याकडे परत आलात व माझ्या आज्ञा पाळल्यात आणि तसे कराल तर आकाशाच्या अंतापर्यंत जरी पांगलेले असाल तरी मी त्यांना तेथून एकत्र करीन. माझ्या नावासाठी म्हणून जे ठिकाण मी निवडले तेथे मी त्यांना परत आणीन.” आता हे तुझे सेवक असून आणि तुझे लोक आहेत, ज्यांना तू आपल्या प्रचंड सामर्थ्याने व आपल्या बलवान हाताने सोडवलेस. तेव्हा, हे परमेश्वरा, मी तुला विनवणी करतो की, तुझ्या सेवकाच्या प्रार्थनेकडे आणि जे तुझे सेवक तुझ्या नावाचे भय धरून आदर दाखवित आहेत त्या सेवकांची ही प्रार्थना तू ऐक. आता आज तुझ्या सेवकाला यश दे आणि या मनुष्यावर त्याची कृपादृष्टी होईल असे कर. मी राजाचा पेला धरणारा असा सेवक होतो.
नहेम्या 1:3-11 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
त्यांनी उत्तर दिले, “जे बंदिवासातील उरलेले बंधू आहेत व त्या प्रदेशात राहू लागले आहेत, ते फारच कष्टात व निंदनीय परिस्थितीत आहेत. यरुशलेमचा तट पडलेल्याच अवस्थेत आहे आणि त्याच्या वेशी जाळून टाकलेल्या आहेत.” हे ऐकताच मी खाली बसलो व रडू लागलो. त्यानंतर काही दिवस मी अन्नपाणी वर्ज्य केले व मी स्वर्गाच्या परमेश्वरासमोर मोठ्या शोकाने प्रार्थना करीत राहिलो. मग मी म्हणालो: “हे महान व भयावह याहवेह, स्वर्गाच्या परमेश्वरा, जे तुमच्यावर प्रीती करतात व तुमच्या आज्ञा पाळतात, त्या सर्वांना तुम्ही प्रीतीने दिलेला करार पाळता, तुमचे कान माझ्या बोलण्याकडे लागो व तुमची दृष्टी तुमचा सेवक इस्राएली लोकांसाठी रात्रंदिवस करीत असलेल्या प्रार्थनेकडे वळो. आम्ही इस्राएली लोकांनी, मी व माझ्या पित्याच्या कुटुंबाने तुमच्याविरुद्ध घोर पाप केले आहे, हे मी कबूल करतो. आम्ही तुमच्याविरुद्ध दुष्टतेचे आचरण केले आहे. तुम्ही तुमचा सेवक मोशेद्वारे आम्हाला दिलेल्या आज्ञा, नियम व आदेश पाळले नाही. “तुम्ही मोशेला काय सांगितले होते याची कृपा करून आठवण करा. तुम्ही म्हटले होते, ‘जर तुम्ही अविश्वासू व्हाल, तर मी तुम्हाला राष्ट्रांमध्ये विखरून टाकीन; पण तुम्ही माझ्याकडे परत याल, माझ्या आज्ञा पाळाल, तर जगाच्या अगदी टोकाच्या कोपर्यातही बंदिवासात असलात, तरी मी तुम्हाला गोळा करून जे ठिकाण मी माझ्या नामाच्या निवासासाठी निवडले आहे तिथे आणेन.’ “ते तुमचेच सेवक व लोक आहेत, ज्यांना तुम्ही आपल्या महान शक्तीने व समर्थ हाताने सोडविले आहे. हे प्रभू, कृपा करून माझ्या प्रार्थनेकडे व जे तुमच्या नामाचा सन्मान करण्यात आनंद मानतात, त्यांची प्रार्थना ऐका. मी राजाकडे एका मोठ्या कृपेची मागणी करण्यासाठी जात आहे; आता कृपा करून या मनुष्याच्या सानिध्यात माझ्याविषयी दया निर्माण होण्यासाठी मला यश द्या.” मी राजाचा प्यालेबरदार होतो.