मार्क 9:42-50
मार्क 9:42-50 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या या लहानातील एकाला जो कोणी देवापासून परावृत्त करील, त्याच्या गळ्यात जात्याची तळी बांधून त्यास समुद्रात फेकून देणे हे त्याच्यासाठी बरे आहे. जर तुझा उजवा हात तुला पाप करण्यासाठी प्रवृत्त करीत असेल तर तो तोडून टाक. दोन हात असून नराकात न विझणाऱ्या अग्नीत जाण्यापेक्षा एक हात नसून जीवनात जाणे बरे. आणि जर तुझा पाय तुला पाप करण्यासाठी प्रवृत्त करीत असेल तर तो काढून टाक. दोन पाय असून नरकात फेकले जावे यापेक्षा लंगडे होऊन जीवनात गेलेले बरे. जर तुझा उजवा डोळा तुला पाप करण्यासाठी प्रवृत्त करीत असेल तर तो काढून टाक. दोन डोळे असून जेथे त्यांना खाणारे किडे मरत नाहीत आणि अग्नी विझत नाही अशा नरकात फेकले जावे यापेक्षा एक डोळा असून देवाच्या राज्यात जाणे हे बरे कारण प्रत्येकाची अग्नीने परीक्षा घेतली जाईल. “मीठ चांगले आहे. जर मीठाने त्याचा खारटपणा घालविला तर ते पुन्हा कसे खारट कराल. तुम्ही आपणामध्ये मीठ असू द्या आणि एकमेकांबरोबर शांतीने रहा.”
मार्क 9:42-50 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“जर कोणी माझ्यावर विश्वास ठेवणार्या या लहानातील एकाला अडखळण करण्यास प्रवृत्त करतो, त्याच्या गळ्यात जात्याची मोठी तळी बांधून त्याला सरोवरात फेकून द्यावे हे त्याच्या चांगल्यासाठी होईल. तुझा हात अडखळण करीत असेल, तर तो कापून टाक. दोन हात असून नरकात जावे व न विझणार्या आगीत जाण्याऐवजी एका हाताने अधू होऊन जीवनात प्रवेश करणे अधिक हिताचे होईल.” ज्या ठिकाणी त्यांना खाणारे किडे कधी मरत नाही, किंवा तेथील अग्नी कधी विझत नाही. जर तुझा पाय अडखळण करत असेल, तर तो कापून टाक. दोन पाय असून नरकात टाकले जावे, यापेक्षा एका पायाने अपंग होऊन जीवनात प्रवेश करणे हे तुझ्या चांगल्यासाठी आहे. ज्या ठिकाणी त्यांना खाणारे किडे कधी मरत नाही, किंवा तेथील अग्नी कधी विझत नाही. जर तुझा डोळा अडखळण करीत असेल तर तो उपटून फेकून दे. दोन डोळयांसह अग्निच्या नरकात जाण्यापेक्षा एका डोळ्याने परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करणे हे तुझ्या हिताचे आहे. ज्या ठिकाणी, “ ‘त्यांना खाणारे किडे कधी मरत नाही, किंवा तेथील अग्नी कधी विझत नाही.’ प्रत्येकजण अग्निद्वारे खारट केले जातील. “मीठ चांगले आहे, पण मिठाचा खारटपणा गेला तर त्याचा खारटपणा कशाने आणाल? तुमच्यातील मीठ गमावू नका. एकमेकांशी शांतीने राहा.”
मार्क 9:42-50 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
माझ्यावर विश्वास ठेवणार्या ह्या लहानांतील एकाला जो कोणी पापास प्रवृत्त करील, त्याच्या गळ्यात मोठ्या जात्याची तळी बांधून त्याला समुद्रात टाकून द्यावे हेच त्याच्या हिताचे आहे. तुझा हात तुला पापास प्रवृत्त करीत असेल तर तो तोडून टाक; दोन हात असून नरकात म्हणजे न विझणार्या अग्नीत जावे, ह्यापेक्षा व्यंग होऊन जीवनात जावे हे तुझ्या हिताचे आहे. तुझा पाय तुला पापास प्रवृत्त करीत असेल तर तो तोडून टाक; दोन पाय असून नरकात टाकले जावे ह्यापेक्षा पंगू होऊन जीवनात जावे हे तुझ्या हिताचे आहे. तुझा डोळा तुला पापास प्रवृत्त करत असेल तर तो उपटून टाक; दोन डोळे असून जेथे ‘त्यांचा किडा मरत नाही व अग्नी विझत नाही’ अशा नरकात टाकले जावे, ह्यापेक्षा एकडोळ्या होऊन देवाच्या राज्यात जावे हे तुझ्या हिताचे आहे. कारण प्रत्येक मनुष्य अग्नीने शुद्ध केला जाईल, [व प्रत्येक बलिदान मिठाने खारवतील]. मीठ चांगला पदार्थ आहे; परंतु मिठाचा खारटपणा गेला तर त्याला रुची कशाने आणाल? तुम्ही आपल्यामध्ये मीठ असू द्या व एकमेकांबरोबर शांतीने राहा.”
मार्क 9:42-50 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
विश्वास ठेवणाऱ्या ह्या लहानांतील एकाला जो पापास प्रवृत्त करील, त्याच्या गळ्यात मोठ्या जात्याची तळी बांधून त्याला समुद्रात टाकून द्यावे, हे त्याच्या हिताचे आहे. तुझा हात तुला पाप करण्यासाठी प्रवृत्त करत असेल, तर तो तोडून टाक. [दोन हात असून नरकात, म्हणजे न विझणाऱ्या अग्नीत जावे ह्यापेक्षा एका हाताविना जीवनात जावे, हे तुझ्या हिताचे आहे.] तुझा पाय तुला पाप करण्यासाठी प्रवृत्त करत असेल, तर तो तोडून टाक. [दोन पाय असून नरकात टाकले जावे ह्यापेक्षा एका पायाविना जीवनात जावे, हे तुझ्या हिताचे आहे.] तुझा डोळा तुला पाप करण्यासाठी प्रवृत्त करत असेल तर तो उपटून टाक. दोन डोळे असून जेथे किडा मरत नाही व अग्नी विझत नाही अशा नरकात टाकले जावे, ह्यापेक्षा एका डोळ्याने देवाच्या राज्यात जावे, हे तुझ्या हिताचे आहे. प्रत्येक मनुष्य अग्नीने शुद्ध केला जाईल. मीठ चांगला पदार्थ आहे, परंतु मिठाचा खारटपणा गेला तर त्याला चव कशाने आणता येईल? तुमच्यात मीठ असू द्या व तुम्ही एकमेकांबरोबर शांतीने राहा.”