मार्क 9:30-32
मार्क 9:30-32 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
नंतर ते तेथून निघून गालीलामधून चालले होते; आणि हे कोणास कळू नये, अशी त्याची इच्छा होती. कारण तो आपल्या शिष्यांना शिकवत होता; तो त्यांना असे सांगत होता की, “मनुष्याचा पुत्र माणसांच्या हाती दिला जाणार आहे; ते त्याला जिवे मारतील; आणि मारला गेल्यानंतर तिसर्या दिवशी तो पुन्हा उठेल.” परंतु ह्या बोलण्याचा अर्थ त्यांना समजला नाही व त्याला विचारण्यास ते भ्याले.
मार्क 9:30-32 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
ते तेथून निघाले आणि गालील प्रांतातून प्रवास करीत चालले होते. हे कोणालाही कळू नये अशी येशूची इच्छा होती. कारण तो आपल्या शिष्यांना शिकवीत होता. तो त्यांना म्हणाला, “मनुष्याचा पुत्र विश्वासघाताने धरून मनुष्यांच्या हाती दिला जाणार आहे. ते त्यास ठार मारतील. परंतु मारला गेल्यानंतर तो तिसऱ्या दिवशी उठेल.” पण या बोलण्याचा अर्थ त्यांना समजला नाही आणि त्याविषयी त्यास विचारण्यास ते भीत होते.
मार्क 9:30-32 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
ते ठिकाण सोडल्यानंतर ते गालील प्रांतामधून गेले. येशूंनी आपण कुठे आहोत हे कोणालाही कळू न देण्याचा प्रयत्न केला, कारण ते आपल्या शिष्यांना शिक्षण देत होते. ते त्यांना म्हणाले, “मानवपुत्राला मनुष्यांच्या हाती धरून दिले जाईल. ते त्याला जिवे मारतील, पण तीन दिवसानंतर तो पुन्हा उठेल.” परंतु ते काय म्हणतात हे ते समजले नाहीत आणि त्या गोष्टींविषयी विचारण्याची त्यांना भीती वाटली.
मार्क 9:30-32 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
नंतर ते तेथून निघून गालीलामधून चालले होते; आणि हे कोणास कळू नये, अशी त्याची इच्छा होती. कारण तो आपल्या शिष्यांना शिकवत होता; तो त्यांना असे सांगत होता की, “मनुष्याचा पुत्र माणसांच्या हाती दिला जाणार आहे; ते त्याला जिवे मारतील; आणि मारला गेल्यानंतर तिसर्या दिवशी तो पुन्हा उठेल.” परंतु ह्या बोलण्याचा अर्थ त्यांना समजला नाही व त्याला विचारण्यास ते भ्याले.
मार्क 9:30-32 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
येशू व त्याचे शिष्य तेथून निघाले व ते गालीलमधून जात आहेत, हे कोणास कळू नये अशी येशूची इच्छा होती; तो त्याच्या शिष्यांना शिकवत असे, “मनुष्याचा पुत्र माणसांच्या हाती दिला जाणार आहे. ते त्याला ठार मारतील आणि मृत्यूनंतर तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठेल.” परंतु ह्या बोलण्याचा अर्थ त्यांना समजला नाही व ते त्याला विचारण्यास धजले नाहीत.