मार्क 9:21-24
मार्क 9:21-24 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
नंतर येशूने त्याच्या वडिलांना विचारले, “किती काळ हा असा आहे?” वडीलांनी उत्तर दिले, “बाळपणापासून हा असा आहे. पुष्कळदा ठार करण्यासाठी त्याने त्यास अग्नीत किंवा पाण्यात टाकले. जर आपल्या हातून काही होणे शक्य असेल तर आम्हावर दया करा व आम्हास मदत करा.” येशू त्यास म्हणाला, “शक्य असेल तर, असे कसे म्हणतोस? विश्वास ठेवणाऱ्याला सर्वकाही शक्य आहे.” तेव्हा लागलेच मुलाचे वडील मोठ्याने ओरडून म्हणाले, “मी विश्वास करतो, माझा अविश्वास घालवून टाका.”
मार्क 9:21-24 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“हा केव्हापासून असा आहे?” येशूंनी त्याच्या वडिलांना विचारले. वडिलांनी उत्तर दिले, “अगदी बालपणापासून, त्याने मुलाला अनेकदा जिवे मारण्याकरिता विस्तवात, नाही तर पाण्यात फेकून दिले आहे. परंतु तुम्ही काही करू शकत असाल तर आमच्यावर दया करा आणि आम्हाला मदत करा.” “जर तुम्हाला शक्य असेल?” येशू म्हणाले, “जो विश्वास ठेवतो त्याला सर्वकाही शक्य आहे.” मुलाच्या वडिलांनी झटकन उत्तर दिले, “मी विश्वास ठेवतो, माझा अविश्वास दूर करण्यास मला साहाय्य करा!”
मार्क 9:21-24 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तेव्हा त्याने त्याच्या बापाला विचारले, “ह्याला असे होऊन किती काळ लोटला?” तो म्हणाला, “बाळपणापासून. ह्याचा नाश करावा म्हणून त्याने ह्याला पुष्कळदा विस्तवात व पाण्यात टाकले; पण आपल्या हातून काही होणे शक्य असेल तर आमच्यावर दया करा व आम्हांला साहाय्य करा.” येशू त्याला म्हणाला, “शक्य असेल तर, असे कसे म्हणतोस? विश्वास बाळगणार्याला सर्वकाही शक्य आहे.” लगेचच मुलाचा बाप [डोळ्यांत आसवे आणून] मोठ्याने म्हणाला, “प्रभूजी, माझा विश्वास आहे, माझा अविश्वास घालवून टाका.”
मार्क 9:21-24 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
येशूने त्याच्या वडिलांना विचारले, “ह्याला असे कधीपासून होत आहे?” ते म्हणाले, “बालपणापासून. ह्याचा नाश करावा म्हणून भुताने ह्याला पुष्कळदा अग्नीत व पाण्यात टाकले. आपल्या हातून काही होणे शक्य असेल तर आम्हांवर दया करा व आम्हांला साहाय्य करा.” येशू त्यांना म्हणाला, “हो, जर तू स्वतः विश्वास ठेवलास तर. विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे.” लगेच मुलाचे वडील मोठ्याने म्हणाले, “माझा विश्वास आहे, पण माझा अविश्वास दूर करण्याकरता मला साहाय्य करा.”