मार्क 7:33-35
मार्क 7:33-35 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
येशूने त्यास लोकांपासून एका बाजूस घेऊन त्याच्या कानात आपली बोटे घातली व थुंकून त्याच्या जीभेला स्पर्श केला. त्याने स्वर्गाकडे पाहून उसासा टाकला व तो म्हणाला, “इफ्फाथा.” म्हणजे, “मोकळा हो.” आणि त्याच क्षणी त्याचे कान मोकळे झाले आणि जीभेचा बंद सुटला व त्यास बोलता येऊ लागले.
मार्क 7:33-35 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
येशूंनी त्याला गर्दीतून बाजूला नेले. त्याच्या कानात त्यांनी बोटे घातली. नंतर ते थुंकले आणि त्या मनुष्याच्या जिभेला केला. मग स्वर्गाकडे दृष्टी लावून व एक निःश्वास सोडून ते म्हणाले, “इप्फाता” म्हणजे, “मोकळा हो” ताबडतोब त्या मनुष्याचे कान उघडले व त्याच्या जिभेचे बंधन मोकळे झाले आणि त्याला स्पष्ट बोलता येऊ लागले.
मार्क 7:33-35 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तेव्हा त्याने त्याला लोकांपासून एकीकडे नेऊन त्याच्या कानांत बोटे घातली व थुंकून त्याच्या जिभेला स्पर्श केला; आणि वर स्वर्गाकडे पाहून त्याने उसासा टाकला व म्हटले, “इप्फाथा,” म्हणजे “मोकळा हो.” तेव्हा त्याचे कान मोकळे झाले व त्याच्या जिभेचा बंद लगेच सुटून तो स्पष्ट बोलू लागला.
मार्क 7:33-35 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
येशूने त्याला लोकांपासून एकीकडे नेऊन त्याच्या कानांत बोटे घातली व थुंकून त्याने त्याच्या जिभेला स्पर्श केला आणि वर स्वर्गाकडे पाहून त्याने दीर्घ उसासा टाकला व म्हटले, “इफ्फाथा”, म्हणजे “मोकळा हो.” तेव्हा त्याचे कान मोकळे झाले व त्याच्या जिभेचा बंध तत्काळ सुटून तो स्पष्ट बोलू लागला.