YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मार्क 7:31-35

मार्क 7:31-35 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

सोर सोडून येशू सीदोन प्रांतामधून गेले आणि तेथून दकापलीस रस्त्याने ते पुन्हा गालील समुद्राकडे आले. तेथे काही लोकांनी एका बहिर्‍या आणि बोबड्या अशा मनुष्याला त्यांच्याकडे आणले. येशूंनी त्याच्यावर हात ठेवून त्याला बरे करावे अशी लोकांनी येशूंना विनंती केली. येशूंनी त्याला गर्दीतून बाजूला नेले. त्याच्या कानात त्यांनी बोटे घातली. नंतर ते थुंकले आणि त्या मनुष्याच्या जिभेला केला. मग स्वर्गाकडे दृष्टी लावून व एक निःश्वास सोडून ते म्हणाले, “इप्फाता” म्हणजे, “मोकळा हो” ताबडतोब त्या मनुष्याचे कान उघडले व त्याच्या जिभेचे बंधन मोकळे झाले आणि त्याला स्पष्ट बोलता येऊ लागले.

सामायिक करा
मार्क 7 वाचा