मार्क 4:10-20
मार्क 4:10-20 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तो एकान्तात असता त्याच्याबरोबर बारा जणांसह जे होते त्यांनी त्याला दाखल्यांविषयी विचारले. तो त्यांना म्हणाला, “देवाच्या राज्याचे रहस्यदान तुम्हांलाच दिले आहे; परंतु बाहेरच्यांना सर्वकाही दाखल्यांनी सांगण्यात येते; ह्यासाठी की, त्यांनी पाहून घ्यावे पण त्यांना दिसू नये, ऐकून घ्यावे पण त्यांना कळू नये, त्यांच्या मनाचा पालट होऊ नये व त्यांना क्षमा मिळू नये.” तो त्यांना म्हणाला, “हा दाखला तुम्हांला समजला नाही काय? तर मग सर्व दाखले कसे समजतील? पेरणारा वचन पेरतो. वाटेवर वचन पेरले जाते तेथील लोक हे आहेत की, त्यांनी ऐकल्याबरोबर सैतान येऊन त्यांच्यातले पेरलेले वचन हिरावून घेतो. तसेच खडकाळ जमिनीत पेरलेले हे आहेत की, वचन ऐकताच ते आनंदाने ग्रहण करतात; तथापि त्यांच्यामध्ये मूळ नसल्याकारणाने ते अल्पकाळ टिकाव धरतात; मग वचनामुळे संकट आले किंवा छळ झाला म्हणजे ते लगेच अडखळतात. काटेरी झुडपांमध्ये पेरलेले हे आहेत की, ते वचन ऐकून घेतात, व नंतर प्रपंचाची चिंता, द्रव्याचा मोह व इतर गोष्टींचा लोभ ही त्यांच्यामध्ये शिरून वचनाची वाढ खुंटवतात आणि ते निष्फळ होते. चांगल्या जमिनीत पेरलेले हे आहेत की, ते वचन ऐकून ते स्वीकारतात; मग कोणी तीसपट, कोणी साठपट, कोणी शंभरपट असे पीक देतात.”
मार्क 4:10-20 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तो एकांती असता त्याच्याबरोबर बारा जणांसह जे होते त्यांनी त्यास दाखल्यांविषयी विचारले. तो त्यांना म्हणाला, “देवाच्या राज्याचे रहस्यदान तुम्हास दिले आहे, परंतु बाहेरच्यांना सर्वकाही दाखल्यांनी सांगण्यात येते. यासाठी की त्यांनी पाहत असता पाहावे परंतु त्यांना दिसू नये, आणि ऐकत असता त्यांनी ऐकावे, पण समजू नये. नाही तर कदाचित त्यांची माने फिरतील आणि देव त्यांना क्षमा करील.” तो म्हणाला, “हा दाखला तुम्हास समजला नाही काय, तर मग इतर बाकीचे दाखले तुम्हास कसे समजतील? पेरणारा वचन पेरतो. वाटेवर वचन पेरले जाते तेथील लोक हे आहेत की, त्यांनी ऐकल्याबरोबर सैतान येऊन त्यांच्यातले पेरलेले वचन हिरावून घेतो. तसेच खडकाळ जमिनीत पेरलेले हे आहेत की, वचन ऐकताच ते आनंदाने ग्रहण करतात; तथापि त्यांच्यामध्ये मूळ नसल्याकारणाने ते थोडा काळच टिकाव धरतात; मग वचनामुळे संकट आले किंवा छळ झाला म्हणजे ते लगेच अडखळतात. काटेरी झुडपांमध्ये पेरलेले हे आहेत की, ते वचन ऐकून घेतात, परंतु संसाराची चिंता, संपत्तीचा मोह व इतर गोष्टींचा लोभ ही त्यांच्यामध्ये शिरून वचनाची वाढ खुंटवतात आणि ते निष्फळ होते. चांगल्या जमिनीत पेरलेले हे आहेत की, ते वचन ऐकून त्याचा स्वीकार करतात मग कोणी तीसपट, कोणी साठपट, कोणी शंभरपट असे पीक देतात.”
मार्क 4:10-20 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मग ते एकटे असताना बारा जणांनी आणि इतरांनी त्यांना दाखल्याबद्दल विचारले. ते म्हणाले, “परमेश्वराच्या राज्याची रहस्ये जाणून घेण्याचे ज्ञान तुम्हाला दिले आहे. परंतु बाहेरच्यांना सर्वगोष्टी दाखल्याद्वारेच सांगण्यात येतील. यासाठी की, “ते पाहत असले तरी त्यांना काही दिसत नाही, आणि ते ऐकतात तर, परंतु काही समजत नाही; कदाचित ते वळतील आणि त्यांची क्षमा होईल!” नंतर येशू त्यांना म्हणाले, “तुम्हाला हा दाखला समजत नाही का? तर इतर दाखले तुम्हाला कसे समजतील? शेतकरी वचनाची पेरणी करतो. काही लोक त्या वाटेवर पडलेल्या बी प्रमाणे आहेत, जिथे वचन पेरले जाते. ते वचन लगेच ऐकतात, पण सैतान येतो आणि त्यांच्या हृदयात पेरलेले वचन हिरावून नेतो. काहीजण, खडकाळ जमिनीत बी पडते त्याप्रमाणे आहेत, ते वचन ऐकतात आणि तत्काळ आनंदाने स्वीकारतात. पण वचनामुळे संकटे आली किंवा त्यांचा छळ होऊ लागला की ते लगेच मागे जातात. पण त्यांना मूळ नसल्यामुळे थोडा काळ टिकतात. काही असे आहेत, की ते काटेरी झुडपांमध्ये पेरणी केलेल्या बियांप्रमाणे आहेत, ते वचन ऐकतात; परंतु संसाराची चिंता, पैशांची लालसा व इतर गोष्टींची हाव यांची त्यांना भुरळ पडते आणि त्यामुळे परमेश्वराच्या वचनाची वाढ खुंटते व फळ येत नाही. याउलट काहीजण उत्तम जमिनीत बी पडते त्याप्रमाणे आहेत, ते वचन ऐकतात, स्वीकार करतात, पीक देतात—जे पेरले होते त्यापेक्षा तीसपट, साठपट आणि शंभरपट पीक देतात.”
मार्क 4:10-20 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तो एकान्तात असता त्याच्याबरोबर बारा जणांसह जे होते त्यांनी त्याला दाखल्यांविषयी विचारले. तो त्यांना म्हणाला, “देवाच्या राज्याचे रहस्यदान तुम्हांलाच दिले आहे; परंतु बाहेरच्यांना सर्वकाही दाखल्यांनी सांगण्यात येते; ह्यासाठी की, त्यांनी पाहून घ्यावे पण त्यांना दिसू नये, ऐकून घ्यावे पण त्यांना कळू नये, त्यांच्या मनाचा पालट होऊ नये व त्यांना क्षमा मिळू नये.” तो त्यांना म्हणाला, “हा दाखला तुम्हांला समजला नाही काय? तर मग सर्व दाखले कसे समजतील? पेरणारा वचन पेरतो. वाटेवर वचन पेरले जाते तेथील लोक हे आहेत की, त्यांनी ऐकल्याबरोबर सैतान येऊन त्यांच्यातले पेरलेले वचन हिरावून घेतो. तसेच खडकाळ जमिनीत पेरलेले हे आहेत की, वचन ऐकताच ते आनंदाने ग्रहण करतात; तथापि त्यांच्यामध्ये मूळ नसल्याकारणाने ते अल्पकाळ टिकाव धरतात; मग वचनामुळे संकट आले किंवा छळ झाला म्हणजे ते लगेच अडखळतात. काटेरी झुडपांमध्ये पेरलेले हे आहेत की, ते वचन ऐकून घेतात, व नंतर प्रपंचाची चिंता, द्रव्याचा मोह व इतर गोष्टींचा लोभ ही त्यांच्यामध्ये शिरून वचनाची वाढ खुंटवतात आणि ते निष्फळ होते. चांगल्या जमिनीत पेरलेले हे आहेत की, ते वचन ऐकून ते स्वीकारतात; मग कोणी तीसपट, कोणी साठपट, कोणी शंभरपट असे पीक देतात.”
मार्क 4:10-20 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
येशू एकान्ती असता त्याचे प्रबोधन ज्यांनी ऐकले होते, त्यांपैकी काहींनी बारा जणांसह त्याच्याकडे येऊन त्याला ह्या दाखल्याविषयी विचारले. त्याने त्यांना उत्तर दिले, “देवाच्या राज्याचे रहस्य तुम्हांला समजावून दिले आहे. परंतु बाहेरच्यांना सर्व काही दाखल्यांनी सांगण्यात येते. अशासाठी की, त्यांनी पाहावे पण त्यांना आकलन होऊ नये; ऐकून घ्यावे पण त्यांना समजू नये; म्हणजे त्यांनी देवाकडे पुन्हा वळू नये व त्यांना क्षमा मिळू नये.” त्याने त्यांना पुढे विचारले, “हा दाखला तुम्हांला समजला नाही काय? तर मग इतर दाखले तुम्हांला कसे समजतील? पेरणारा वचन पेरतो. काही लोक वाटेवर पडलेल्या वचनासारखे आहेत. त्यांनी वचन ऐकल्याबरोबर सैतान येतो व त्यांच्यात पेरलेले वचन हिरावून घेतो. इतर काही लोक खडकाळ जमिनीत पेरलेल्या बीसारखे आहेत. हे लोक वचन ऐकताच ते आनंदाने ग्रहण करतात. पण त्यांचे मूळ खोलवर न गेल्यामुळे ते अल्पकाळ टिकाव धरतात. त्या वचनामुळे संकट आले किंवा छळ झाला म्हणजे ते तत्क्षणी वचन सोडून देतात. इतर काही लोक काटेरी झुडुपांमध्ये पेरलेल्या बीसारखे आहेत. ते वचन ऐकून घेतात. परंतु प्रपंचाची चिंता, पैशाचा मोह व इतर गोष्टींचा लोभ ही त्यांच्यामध्ये शिरून वचनाची वाढ खुंटवतात आणि ते निष्फळ होते. आणखी काही लोक चांगल्या जमिनीत पेरलेल्या बीसारखे आहेत. हे लोक वचन ऐकून ते स्वीकारतात आणि कोणी तीसपट, कोणी साठपट, तर कोणी शंभरपट असे पीक देतात.”