मार्क 2:10-12
मार्क 2:10-12 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
परंतु मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे हे तुम्हांला समजावे म्हणून (तो पक्षाघाती माणसाला म्हणाला) मी तुला सांगतो, “ऊठ, आपली बाज उचलून घे व आपल्या घरी जा.” मग तो उठला व लगेच आपली बाज उचलून सर्वांच्या देखत निघाला; ह्यावरून सर्व जण थक्क झाले व देवाचा गौरव करत म्हणाले, “आम्ही असे कधीच पाहिले नव्हते.”
मार्क 2:10-12 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परंतु मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे हे त्यांना समजावे म्हणून, तो पक्षघाती मनुष्यास म्हणाला, “मी तुला सांगतो, ऊठ, तुझी खाट उचलून घेऊन आपल्या घरी जा.” मग तो लगेच उठला. त्याने आपली खाट उचलून घेऊन सर्वाच्या देखत तो घराच्या बाहेर निघाला; यामुळे ते सर्व आश्चर्यचकित झाले व देवाचे गौरव करत म्हणाले, “आम्ही असे कधीच पाहिले नव्हते.”
मार्क 2:10-12 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तुम्हाला हे समजण्याची गरज आहे की मानवपुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे.” ते पक्षघाती मनुष्याला म्हणाले, “ऊठ, आपले अंथरुण उचल आणि घरी जा.” तो माणूस उठला आणि लगेच अंथरुण उचलून त्या सर्वांसमोर चालत गेला. तेव्हा सर्वांना आश्चर्य वाटले व सर्वांनी परमेश्वराची स्तुती केली. ते म्हणाले, “आम्ही असे काही कधीच पाहिले नाही!”
मार्क 2:10-12 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
परंतु मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर केलेल्या पापांची क्षमा करायचा अधिकार आहे, हे मी तुम्हांला दाखवून देतो.” म्हणून तो पक्षाघाती माणसाला म्हणाला, “मी तुला सांगतो, ऊठ, आपली खाट उचलून घे व तुझ्या घरी जा.” तो उठला व लगेच त्याची खाट उचलून सर्वांच्या समक्ष निघाला. हे पाहून सर्व जण थक्क झाले व देवाचा गौरव करत म्हणाले, “आम्ही असे कधीच पाहिले नव्हते!”