मार्क 16:9-13
मार्क 16:9-13 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
[आठवड्याच्या पहिल्या दिवशी प्रात:काळी त्याचे पुनरुत्थान झाल्यावर त्याने पहिल्याप्रथम मग्दालीया मरीया हिला दर्शन दिले; हिच्याचमधून त्याने सात भुते काढली होती. तिने जाऊन हे वर्तमान त्याच्याबरोबर पूर्वी असलेल्या आणि आता शोक करत व रडत असलेल्या लोकांना सांगितले. आता तो जिवंत असून तिच्या दृष्टीस पडला होता हे ऐकून त्यांनी विश्वास ठेवला नाही. ह्यानंतर त्यांच्यापैकी दोघे जण बाहेरगावी चालले असता त्यांना तो दुसर्या रूपाने प्रकट झाला. त्यांनी जाऊन इतरांना सांगितले तरी त्यांनी त्यांच्यावरही विश्वास ठेवला नाही.
मार्क 16:9-13 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आठवड्याच्या पहिल्या दिवशी येशू उठल्यावर त्याने प्रथम मग्दालीया नगराची मरीयाला, जिच्यातून त्याने सात भूते काढली होती, तिला दर्शन दिले. ती गेली आणि रडून शोक करणाऱ्या त्याच्या अनुयायांना तिने हे वृत्त सांगितले. त्यांनी ऐकले की तो जिवंत आहे व तिने त्यास पाहिले आहे. तेव्हा त्यांनी तिच्या म्हणण्यावर विश्वास ठेवला नाही. यानंतर त्यांच्यापैकी दोघे उघड्या माळरानावर चालले होते. गावाकडे जात असता येशू त्यांना दुसऱ्या रुपाने प्रकट झाला. ते परत आले व इतरांना त्याविषयी सांगितले परंतु त्यांनी त्यांच्यावरही विश्वास ठेवला नाही.
मार्क 16:9-13 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
येशू आठवड्याच्या पहिल्या दिवशी पहाटे पुनरुत्थित झाले. ते सर्वप्रथम ज्या स्त्रीमधून त्यांनी सात भुते काढली होती त्या मग्दालिया मरीयेला प्रकट झाले. जे लोक येशूंबरोबर होते आणि जे शोक व विलाप करीत होते, त्यांच्याकडे जाऊन तिने हे वर्तमान त्यांना सांगितले. येशू जिवंत आहे आणि तिने त्यांना प्रत्यक्ष बघितले होते, हे जेव्हा त्यांनी ऐकले तेव्हा त्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही. नंतर त्याच दिवशी शहरातून चाललेल्या दोघांना येशूंनी वेगळ्या रूपात दर्शन दिले. ते परत आले व इतरांना अहवाल दिला, परंतु त्यांच्यावरही त्यांनी विश्वास ठेवला नाही.
मार्क 16:9-13 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
[आठवड्याच्या पहिल्या दिवशी प्रात:काळी त्याचे पुनरुत्थान झाल्यावर त्याने पहिल्याप्रथम मग्दालीया मरीया हिला दर्शन दिले; हिच्याचमधून त्याने सात भुते काढली होती. तिने जाऊन हे वर्तमान त्याच्याबरोबर पूर्वी असलेल्या आणि आता शोक करत व रडत असलेल्या लोकांना सांगितले. आता तो जिवंत असून तिच्या दृष्टीस पडला होता हे ऐकून त्यांनी विश्वास ठेवला नाही. ह्यानंतर त्यांच्यापैकी दोघे जण बाहेरगावी चालले असता त्यांना तो दुसर्या रूपाने प्रकट झाला. त्यांनी जाऊन इतरांना सांगितले तरी त्यांनी त्यांच्यावरही विश्वास ठेवला नाही.
मार्क 16:9-13 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच रविवारी प्रातःकाळी येशूचे पुनरुत्थान झाल्यावर त्याने पहिल्या प्रथम मग्दालिया मरियेला दर्शन दिले, हिच्यामधून त्याने सात भुते काढली होती. तिने जाऊन शोक करत व रडत असलेल्या येशूच्या सोबत्यांना हे वर्तमान सांगितले. परंतु तो जिवंत असून तिच्या दृष्टीस पडला होता, हे ऐकून त्यांनी विश्वास ठेवला नाही. ह्यानंतर त्यांच्यापैकी दोघे जण गावाकडे जात असताना त्यांच्यासमोर तो निराळ्या प्रकारे प्रकट झाला. त्यांनी जाऊन इतरांना सांगितले. परंतु त्यांनी ह्या गोष्टीवर विश्वास ठेवला नाही.