मार्क 16:6-7
मार्क 16:6-7 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तो त्यांना म्हणाला, भयभीत होऊ नका, तुम्ही नासरेथकर येशू जो वधस्तंभावर खिळला होता त्याचा शोध करीत आहात. पण तो उठला आहे. येथे नाही. त्यांनी त्यास ठेवले होते ती जागा पाहा. जा आणि त्याच्या शिष्यांना व पेत्रालाही सांगा की, तो तुमच्या अगोदर गालील प्रांतात जात आहे, त्याने तुम्हास सांगितल्याप्रमाणे तेथे तो तुम्हास दृष्टीस पडेल.
मार्क 16:6-7 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“भिऊ नका,” तो म्हणाला, “क्रूसावर खिळलेल्या ज्या नासरेथकर येशूंना तुम्ही शोधीत आहात. ते येथे नाहीत, ते पुन्हा उठले आहेत. त्यांना ठेविले होते ती जागा पाहा! पण जा, ही बातमी त्यांच्या शिष्यांना आणि पेत्रालाही सांगा, ‘ते तुमच्या पुढे गालीलात जात आहेत. जसे त्यांनी तुम्हाला सांगितले होते तसे ते तेथे तुम्हाला भेटतील.’ ”
मार्क 16:6-7 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तो त्यांना म्हणाला, “चकित होऊ नका; वधस्तंभावर खिळलेल्या येशू नासरेथकराचा शोध तुम्ही करीत आहात. तो उठला आहे, तो येथे नाही; त्याला ठेवले होते ती ही जागा पाहा. तर जा, त्याच्या शिष्यांना व पेत्रालाही सांगा की, तो तुमच्यापुढे गालीलात जात आहे. त्याने तुम्हांला सांगितले होते त्याप्रमाणे तो तेथे तुमच्या दृष्टीस पडेल.”
मार्क 16:6-7 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
तो त्यांना म्हणाला, “चकित होऊ नका, क्रुसावर खिळलेल्या नासरेथकर येशूचा तुम्ही शोध घेत आहात ना? तो उठला आहे. तो येथे नाही. त्याला ठेवले होते, ती ही जागा पाहा. जा. त्याच्या शिष्यांना व पेत्रालाही सांगा की, तो तुमच्यापुढे गालीलमध्ये जात आहे. त्याने तुम्हांला सांगितले होते, त्याप्रमाणे तो तेथे तुमच्या दृष्टीस पडेल.”