मार्क 15:21-24
मार्क 15:21-24 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तेव्हा शिमोन नावाचा कोणीएक कुरेनेकर, म्हणजे आलेक्सांद्र व रूफ ह्यांचा बाप, हा रानातून येऊन जवळून जात असता त्याला त्यांनी त्याचा वधस्तंभ वाहण्याकरता वेठीस धरले. मग त्यांनी त्याला गुलगुथा म्हणजे कवटीची जागा येथे आणले. आणि त्याला बोळ मिसळलेला द्राक्षारस पिण्यास दिला, परंतु त्याने तो घेतला नाही. तेव्हा त्यांनी त्याला वधस्तंभावर खिळले, आणि त्याच्या कपड्यांपैकी कोणता कपडा कोणी घ्यावा ह्यासाठी ‘त्यांवर चिठ्ठ्या टाकून ते वाटून घेतले.’
मार्क 15:21-24 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
वाटेत त्यांना कुरेनेकर शिमोन नावाचा एक मनुष्य दिसला. तो आलेक्सांद्र व रूफ यांचा पिता होता व आपल्या रानातून घरी परत चालला होता. मग सैनिकांनी त्यास जबरदस्तीने येशूचा वधस्तंभ वहावयास लावले. आणि त्यांनी येशूला गुलगुथा म्हणजे कवटीची जागा म्हटलेल्या ठिकाणी आणले. त्यांनी त्यास बोळ मिसळलेला द्राक्षरस दिला परंतु त्याने तो घेतला नाही. त्यांनी त्यास वधस्तंभावर खिळले, कोणी कोणते कपडे घ्यावे यासाठी त्यांनी चिठठ्या टाकल्या व त्याचे कपडे वाटून घेतले.
मार्क 15:21-24 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
कुरेने गावचा एक रहिवासी, आलेक्सांद्र व रूफस यांचा पिता शिमोन रानातून परत येत होता व जवळून जात असता, त्यांनी त्याला जबरदस्तीने क्रूस वाहण्यास भाग पाडले. मग त्यांनी येशूंना गोलगोथा या नावाने ओळखल्या जाणार्या जागी आणले. गोलगोथाचा अर्थ “कवटीची जागा” असा आहे. त्यांनी येशूंना गंधरस मिसळलेला द्राक्षारस दिला, परंतु त्यांनी त्याचा स्वीकार केला नाही. मग त्यांनी त्याला क्रूसावर खिळल्यानंतर, त्यांची वस्त्रे वाटून, प्रत्येकाला काय मिळेल हे पाहण्यासाठी त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या.
मार्क 15:21-24 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तेव्हा शिमोन नावाचा कोणीएक कुरेनेकर, म्हणजे आलेक्सांद्र व रूफ ह्यांचा बाप, हा रानातून येऊन जवळून जात असता त्याला त्यांनी त्याचा वधस्तंभ वाहण्याकरता वेठीस धरले. मग त्यांनी त्याला गुलगुथा म्हणजे कवटीची जागा येथे आणले. आणि त्याला बोळ मिसळलेला द्राक्षारस पिण्यास दिला, परंतु त्याने तो घेतला नाही. तेव्हा त्यांनी त्याला वधस्तंभावर खिळले, आणि त्याच्या कपड्यांपैकी कोणता कपडा कोणी घ्यावा ह्यासाठी ‘त्यांवर चिठ्ठ्या टाकून ते वाटून घेतले.’
मार्क 15:21-24 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
गावातून शहराकडे जायला निघालेला शिमोन नावाचा माणूस त्यांना वाटेत भेटला. शिपायांनी त्याच्यावर बळजबरी करून त्याला येशूचा क्रूस वाहण्यास भाग पाडले. शिमोन कुरेनेकर होता व आलेक्झांद्र व रूफ ह्यांचा तो बाप होता. त्यांनी येशूला गुलगुथा म्हणजे कवटीच्या जागेवर आणले. त्यानंतर त्यांनी येशूला गंधरस मिसळलेला द्राक्षारस प्यायला दिला, परंतु त्याने तो घेतला नाही. त्यानंतर त्यांनी त्याला क्रुसावर खिळले आणि त्याच्या कपड्यांपैकी कोणते कपडे कोणी घ्यावे ह्यासाठी चिठ्ठ्या टाकून ते वाटून घेतले.