YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मार्क 14:43-50

मार्क 14:43-50 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

आणि येशू बोलत आहे तोपर्यंत बारा जणांपैकी एक यहूदा तेथे आला. त्याच्याबरोबर मुख्य याजक लोक व नियमशास्त्राचे शिक्षक आणि वडील यांनी पाठवलेले अनेक लोक तलवारी व सोटे घेऊन आले. घात करून देणाऱ्याने त्यांना अशी खूण दिली होती की, “मी ज्या कोणाचे चुंबन घेईन तोच तो आहे, त्यास धरा आणि सांभाळून न्या.” मग यहूदा आल्याबरोबर तो येशूकडे गेला आणि म्हणाला, “रब्बी!” आणि असे म्हणून यहूदाने येशूचे चुंबन घेतले. नंतर त्यांनी त्याच्यावर हात टाकले आणि त्यास अटक केली. तेथे जवळ उभे असलेल्यांपैकी एकाने आपली तलवार काढली आणि महायाजकाच्या नोकरावर वार करून त्याचा कान कापून टाकला. नंतर येशू त्यांना म्हणाला, “मी लुटारू असल्याप्रमाणे तुम्ही तलवारी आणि सोटे घेऊन मला पकडायला बाहेर पडलात काय? मी दररोज परमेश्वराच्या भवनात शिकवीत असता तुम्हाबरोबर होतो आणि तुम्ही मला अटक केली नाही. परंतु शास्त्रलेख पूर्ण झालाच पाहिजे.” सर्व शिष्य त्यास सोडून पळून गेले.

सामायिक करा
मार्क 14 वाचा

मार्क 14:43-50 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

ते बोलत आहे तेव्हाच, यहूदा, त्यांच्या बारा शिष्यांपैकी एक, प्रमुख याजकांनी आणि वडीलजनांनी पाठविलेल्या, तरवारी आणि सोटे धारण करणार्‍या जमावाला बरोबर घेऊन पुढे आला. आता त्या विश्वासघातक्याने जमावाला खूण देऊन ठेवली होती की, “ज्या मनुष्याचे मी चुंबन घेईन त्याला अटक करा आणि शिपायांच्या बंदोबस्तात घेऊन जा.” तत्क्षणी यहूदा येशूंच्या जवळ गेला, “गुरुजी!” त्याने उद्गार काढले आणि त्यांचे चुंबन घेतले. नंतर लोकांनी येशूंना धरले आणि अटक केले. पण तेवढ्यात जे उभे होते त्यांच्यातील एकाने तरवार उपसून प्रमुख याजकाच्या दासावर वार करून त्याचा कान कापून टाकला. येशूंनी विचारले, “मी बंडखोरांचा नेता आहे काय, की तुम्ही तलवार आणि लाठ्या घेऊन मला धरावयास आला आहात? मी दररोज तुमच्याबरोबर होतो, मंदिराच्या परिसरात शिकवीत असे, पण तुम्ही मला अटक केली नाही. परंतु धर्मशास्त्रात लिहिलेली भविष्यवाणी पूर्ण झाली पाहिजे.” मग सर्वजण त्यांना सोडून पळून गेले.

सामायिक करा
मार्क 14 वाचा

मार्क 14:43-50 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

तो बोलत आहे इतक्यात बारा जणांपैकी एक म्हणजे यहूदा तेथे आला आणि त्याच्याबरोबर मुख्य याजक, शास्त्री व वडील ह्यांच्याकडची एक टोळी तलवारी व सोटे घेऊन आली. त्याला धरून देणार्‍याने तर त्यांना अशी खूण सांगून ठेवली होती की, “मी ज्याचे चुंबन घेई तोच तो आहे; त्याला धरा व नीट बंदोबस्ताने घेऊन जा.” तो आल्यावर लगेचच त्याच्याकडे गेला आणि “गुरूजी,” असे म्हणून त्याने त्याचे चुंबन घेतले. तेव्हा त्या लोकांनी येशूवर हात टाकून त्याला अटक केली. त्याच्याशेजारी जे उभे होते त्यांच्यापैकी एकाने तलवार उपसली आणि प्रमुख याजकाच्या चाकरावर वार करून त्याचा कान छाटून टाकला. तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “एखाद्या लुटारूवर तलवारी व सोटे घेऊन जावे तसे तुम्ही मला धरण्यास बाहेर पडला आहात काय? मी दररोज मंदिरात शिकवत असता तुमच्याबरोबर असे, पण तुम्ही मला धरले नाही; परंतु शास्त्रलेख पूर्ण व्हावेत म्हणून हे असे घडत आहे.” तेव्हा ते सर्व त्याला सोडून पळून गेले.

सामायिक करा
मार्क 14 वाचा

मार्क 14:43-50 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

येशू बोलत असताना बारांपैकी एक जण म्हणजे यहुदा तेथे आला. त्याच्याबरोबर मुख्य याजक, शास्त्री व वडीलजन ह्यांच्याकडची एक टोळी तलवारी व सोटे घेऊन आली होती. त्याला धरून देणाऱ्याने तर त्यांना अशी खूण सांगून ठेवली होती, “मी ज्याचे चुंबन घेईन, तोच तो आहे, त्याला धरा व त्याला नीट बंदोबस्ताने घेऊन जा.” यहुदा आल्यावर लगेच येशूकडे गेला आणि, “गुरुवर्य”, असे म्हणून त्याने त्याचे चुंबन घेतले. तेव्हा त्या लोकांनी येशूला धरले व त्याला अटक केली. तेथे शेजारी जे उभे होते, त्यांच्यापैकी एकाने तलवार उपसली आणि उच्च याजकांच्या नोकरावर वार करून त्याचा कान कापून टाकला. तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “एखाद्या लुटारूवर तलवारी व सोटे घेऊन जावे, तसे तुम्ही मला धरायला निघालात काय? मी दररोज मंदिरात शिकवत असता तुमच्याबरोबर असे आणि तुम्ही मला धरले नाही, परंतु धर्मशास्त्रलेख पूर्ण होणे आवश्यक आहे.” त्यानंतर त्याचे सर्व शिष्य त्याला सोडून पळून गेले.

सामायिक करा
मार्क 14 वाचा