मार्क 14:22-24
मार्क 14:22-24 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ते भोजन करत असता येशूने भाकर घेऊन व आशीर्वाद देऊन ती मोडली आणि त्यांना देऊन म्हटले, “घ्या, खा, हे माझे शरीर आहे.” आणि त्याने प्याला घेतला व उपकारस्तुती करून त्यांना तो दिला; आणि ते सर्व जण त्यातून प्याले. तो त्यांना म्हणाला, “हे ‘[नवीन] करार’ प्रस्थापित करणारे माझे रक्त आहे, हे पुष्कळांकरता ओतले जात आहे.
मार्क 14:22-24 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
ते भोजन करीत असता येशूने भाकर घेतली, उपकारस्तुती केली, ती मोडली आणि त्यांना दिली. तो म्हणाला, “घ्या, हे माझे शरीर आहे.” नंतर येशूने प्याला घेतला, उपकारस्तुती केली. तो प्याला त्यांना दिला आणि सर्व त्यातून प्याले. मग येशू म्हणाला, “हे माझे नव्या कराराचे रक्त आहे. पुष्कळांसाठी ते ओतले जात आहे.
मार्क 14:22-24 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
भोजन करीत असताना, येशूंनी भाकर घेतली, तिच्यावर आशीर्वाद मागितल्यावर, ती मोडली आणि आपल्या शिष्यांना देत ते म्हणाले, “ही घ्या, हे माझे शरीर आहे.” त्यांनी द्राक्षारसाचा प्याला हाती घेतला, व त्याबद्दल आभार मानले आणि मग तो प्याला त्यांना दिला आणि मग ते सर्व त्यातून प्याले. मग येशू त्यांना म्हणाले, “हे माझ्या कराराचे रक्त आहे, व ते पुष्कळांसाठी ओतले जात आहे
मार्क 14:22-24 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
ते भोजन करत असता, येशूने भाकर घेतली, आशीर्वाद देऊन ती मोडली आणि त्यांना देऊन म्हटले, “घ्या, हे माझे शरीर आहे.” त्यानंतर त्याने प्याला घेतला व परमेश्वराचे आभार मानून त्यांना तो दिला. ते सर्व जण त्यातून प्याले. येशू त्यांना म्हणाला, “हे माझे कराराचे रक्त आहे, हे पुष्कळांकरता ओतले आहे.