मार्क 11:22-24
मार्क 11:22-24 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
येशूने उत्तर दिले, “देवावर विश्वास ठेवा. मी तुम्हास खरे सांगतो की, जो कोणी या डोंगराला ‘उपटून समुद्रात टाकाला जा’ असे म्हणेल व तो आपल्या मनात संशय धरणार नाही आपण जे म्हणतो तसे घडेलच असा विश्वास धरील तर त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. म्हणून मी तुम्हास सांगतो जे काही तुम्ही प्रार्थनेत मागाल ते मिळालेच आहे असा विश्वास धरा आणि ते तुम्हास मिळेल.
मार्क 11:22-24 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
येशूंनी उत्तर दिले, “परमेश्वरावर विश्वास ठेवा, मी तुम्हाला निश्चित सांगतो की, जर कोणी या डोंगराला, ‘ऊठ आणि समुद्रात जाऊन पड,’ असे म्हणेल आणि अंतःकरणात संशय न धरता आपण म्हटले तसे होईल असा विश्वास धरला, तर ती गोष्ट त्यांच्यासाठी केली जाईल. यास्तव मी तुम्हाला सांगतो की, प्रार्थना करून जे काही मागाल, ते तुम्हाला मिळालेच आहे असा विश्वास ठेवा आणि ते तुम्हाला प्राप्त होईल.
मार्क 11:22-24 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
येशूने त्यांना उत्तर दिले, “देवावर विश्वास ठेवा. मी तुम्हांला खचीत सांगतो की, जो कोणी ह्या डोंगराला ‘तू उपटून समुद्रात टाकला जा,’ असे म्हणेल आणि आपल्या अंतःकरणात शंका न बाळगता, आपण म्हणतो तसे घडेलच असा विश्वास धरील त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. म्हणून मी तुम्हांला सांगतो, तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालेच आहे असा विश्वास धरा म्हणजे ते तुम्हांला मिळेल.
मार्क 11:22-24 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
येशूने त्यांना उत्तर दिले, “देवावर विश्वास ठेवा. मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, जो कोणी ह्या डोंगराला ‘तू उपटला जाऊन समुद्रात टाकला जा’, असे म्हणेल आणि आपल्या अंतःकरणात शंका न बाळगता आपण म्हणतो तसे अवश्य घडेल, असा विश्वास धरील, त्याच्याकरता ते केले जाईल. म्हणून मी तुम्हांला सांगतो, तुम्ही प्रार्थना करून जे काही मागता, ते आपल्याला मिळालेच आहे, असा विश्वास धरा म्हणजे ते तुम्हांला मिळेल.