मार्क 10:6-9
मार्क 10:6-9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परंतु उत्पत्तीच्या आरंभापासून देवाने त्यांना नर व नारी असे निर्माण केले. या कारणामुळे पुरूष आपल्या आई-वडीलांना सोडून आपल्या पत्नीशी जडून राहील. आणि ती दोघे एकदेह होतील. म्हणून यापुढे ती दोन नाहीत तर एकदेह आहेत. यासाठी देवाने जे जोडले आहे, ते मनुष्याने तोडू करू नये.”
मार्क 10:6-9 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“परंतु सृष्टीच्या प्रारंभापासूनच परमेश्वराने त्यांना ‘पुरुष व स्त्री.’ असे निर्माण केले. ‘या कारणासाठी पुरुष आपल्या आईवडिलांना सोडून आपल्या पत्नीशी मिळून राहील, आणि ते दोघे एकदेह होतील.’ येथून पुढे ते दोघे नसून एकदेह आहेत. म्हणून परमेश्वराने जे जोडले आहे, ते कोणीही विभक्त करू नये.”
मार्क 10:6-9 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
परंतु उत्पत्तीच्या प्रारंभापासून ‘देवाने त्यांना स्त्रीपुरुष असे उत्पन्न केले.’ ‘ह्या कारणामुळे ‘पुरुष आपल्या आईबापांस सोडून आपल्या बायकोशी जडून राहील; आणि ती दोघे एकदेह होतील.’ ती पुढे दोन नव्हत तर एकदेह आहेत. म्हणून देवाने जे जोडले आहे ते मनुष्याने तोडू नये.”
मार्क 10:6-9 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
परंतु निर्मितीच्या प्रारंभापासून देवाने त्यांना स्त्री व पुरुष असे उत्पन्न केले. ‘ह्या कारणामुळे पती आपल्या आईवडिलांना सोडून आपल्या पत्नीला जडून राहील आणि ती दोघे एकदेह होतील. ती पुढे दोन नव्हेत तर एकदेह आहेत. म्हणून देवाने जे जोडले आहे, ते मनुष्याने विभक्त करू नये.’”