मार्क 10:5-12
मार्क 10:5-12 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
येशू म्हणाला, “केवळ तुमच्या अंतःकरणाच्या कठीणपणामुळे मोशेने ही आज्ञा तुमच्यासाठी लिहून ठेवली. परंतु उत्पत्तीच्या आरंभापासून देवाने त्यांना नर व नारी असे निर्माण केले. या कारणामुळे पुरूष आपल्या आई-वडीलांना सोडून आपल्या पत्नीशी जडून राहील. आणि ती दोघे एकदेह होतील. म्हणून यापुढे ती दोन नाहीत तर एकदेह आहेत. यासाठी देवाने जे जोडले आहे, ते मनुष्याने तोडू करू नये.” नंतर येशू व शिष्य घरात असता, शिष्यांनी या गोष्टीविषयी पुन्हा त्यास विचारले. तो त्यांना म्हणाला, “जो कोणी आपली पत्नी टाकतो व दुसरीबरोबर लग्न करतो तो आपल्या पत्नीविरुद्ध व्यभिचार करतो. आणि जर पत्नी आपल्या पतीला सोडते आणि दुसऱ्याबरोबर लग्न करते, तर तीही व्यभिचार करते.”
मार्क 10:5-12 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
येशूंनी उत्तर दिले, “तुमच्या कठोर अंतःकरणामुळे मोशेने हे नियम तुम्हाला लिहून दिले. परंतु सृष्टीच्या प्रारंभापासूनच परमेश्वराने त्यांना ‘पुरुष व स्त्री.’ असे निर्माण केले. ‘या कारणासाठी पुरुष आपल्या आईवडिलांना सोडून आपल्या पत्नीशी जडून राहील, आणि ते दोघे एकदेह होतील.’ म्हणून येथून पुढे ते दोघे नसून एकदेह आहेत. म्हणून परमेश्वराने जे जोडले आहे, ते कोणीही विभक्त करू नये.” नंतर ते शिष्यांबरोबर पुनः घरात असताना, त्यांनी येशूंना त्याबद्दल विचारले. त्यांनी उत्तर दिले, “जो कोणी व्यभिचाराच्या कारणाशिवाय आपल्या पत्नीला सूटपत्र देतो आणि दुसर्या स्त्रीशी लग्न करतो, तो व्यभिचार करतो. आणि एखादी स्त्री आपल्या पतीला सूटपत्र देते आणि दुसर्या पुरुषाबरोबर लग्न करते, तेव्हा ती व्यभिचार करते.”
मार्क 10:5-12 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
येशू त्यांना म्हणाला, “तुमच्या अंत:करणाच्या कठीणपणामुळे त्याने ही आज्ञा तुमच्यासाठी लिहून ठेवली; परंतु उत्पत्तीच्या प्रारंभापासून ‘देवाने त्यांना स्त्रीपुरुष असे उत्पन्न केले.’ ‘ह्या कारणामुळे ‘पुरुष आपल्या आईबापांस सोडून आपल्या बायकोशी जडून राहील; आणि ती दोघे एकदेह होतील.’ ती पुढे दोन नव्हत तर एकदेह आहेत. म्हणून देवाने जे जोडले आहे ते मनुष्याने तोडू नये.” नंतर घरात त्याच्या शिष्यांनी पुन्हा त्याच गोष्टीविषयी त्याला विचारले. तेव्हा तो त्यांना म्हणाला, “जो कोणी आपल्या बायकोला टाकतो व दुसरे लग्न करतो तो तिच्याविरुद्ध व्यभिचार करतो; आणि जर तिने आपल्या नवर्याला सोडले व दुसरे लग्न केले तर तीही व्यभिचार करते.”
मार्क 10:5-12 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
येशू त्यांना म्हणाला, “तुमच्या अंतःकरणाच्या कठोरपणामुळे त्याने ही आज्ञा तुमच्यासाठी लिहिली. परंतु निर्मितीच्या प्रारंभापासून देवाने त्यांना स्त्री व पुरुष असे उत्पन्न केले. ‘ह्या कारणामुळे पती आपल्या आईवडिलांना सोडून आपल्या पत्नीला जडून राहील आणि ती दोघे एकदेह होतील. ती पुढे दोन नव्हेत तर एकदेह आहेत. म्हणून देवाने जे जोडले आहे, ते मनुष्याने विभक्त करू नये.’” घरी परतल्यावर त्याच्या शिष्यांनी पुन्हा त्याच गोष्टीविषयी त्याला विचारले, तेव्हा तो त्यांना म्हणाला, “जो कोणी आपल्या पत्नीला सूटपत्र देतो व दुसरे लग्न करतो तो तिच्याविरुद्ध व्यभिचार करतो, तसेच जी स्त्री आपल्या पतीला सूटपत्र देते व दुसरे लग्न करते तीही व्यभिचार करते.”