मार्क 10:47-49
मार्क 10:47-49 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जेव्हा त्याने ऐकले की, नासरेथकर येशू जात आहे तेव्हा तो मोठ्याने ओरडून म्हणू लागला, “येशू, दाविदाचे पुत्र माझ्यावर दया करा.” तेव्हा त्याने गप्प बसावे म्हणून अनेकांनी त्यास दटावले. पण तो अधिक मोठ्याने ओरडून म्हणू लागला, “येशू दाविदाचे पुत्र मजवर दया करा.” मग येशू थांबला आणि म्हणाला, “त्याला बोलवा,” तेव्हा त्यांनी आंधळ्या मनुष्यास बोलावून म्हटले, “धीर धर, येशू तुला बोलवत आहे.”
मार्क 10:47-49 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जेव्हा हे नासरेथकर येशू जात आहेत असे त्याने ऐकले, तेव्हा तो मोठ्याने ओरडू लागला, “अहो येशू, दावीदाचे पुत्र, माझ्यावर दया करा!” अनेकांनी त्याला धमकाविले आणि गप्प बसण्यास सांगितले, पण तो अधिकच मोठमोठ्याने ओरडून म्हणू लागला, “अहो, दावीदाचे पुत्र, माझ्यावर दया करा!” येशू थांबले आणि म्हणाले, “त्याला इकडे बोलवा.” त्याप्रमाणे लोक त्या आंधळ्या मनुष्याला म्हणाले, “धीर धर, आपल्या पायांवर उभा राहा, ते तुला बोलावत आहेत.”
मार्क 10:47-49 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तेव्हा हा नासरेथकर येशू आहे हे ऐकून तो मोठमोठ्याने म्हणू लागला, “अहो दावीदपुत्र येशू, माझ्यावर दया करा.” तेव्हा त्याने गप्प राहावे म्हणून अनेकांनी त्याला धमकावले; पण तो अधिकच ओरडू लागला, “अहो दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा.” तेव्हा येशू थांबून म्हणाला, “त्याला बोलवा.” मग ते त्या आंधळ्याला बोलावून म्हणाले, “धीर धर; ऊठ, तो तुला बोलावत आहे.”
मार्क 10:47-49 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
हा नासरेथकर येशू आहे, हे ऐकून तो मोठ्याने ओरडू लागला, “अहो दावीदपुत्र येशू, माझ्यावर दया करा.” त्याने गप्प राहावे म्हणून अनेकांनी त्याला दटावले, पण तो अधिकच ओरडू लागला, “अहो दावीदपुत्र, माझ्यावर दया करा.” येशू थांबून म्हणाला, “त्याला बोलवा.” ते त्या आंधळ्याला बोलावून म्हणाले, “धीर धर, ऊठ, येशू तुला बोलावत आहे.”