मार्क 10:2-4
मार्क 10:2-4 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
काही परूशी येशूकडे आले. त्यांनी त्यास विचारले, “पतीने पत्नी सोडावी हे कायदेशीर आहे काय?” हे तर त्यांनी त्याची परीक्षा पाहण्यासाठी विचारले. येशूने त्यांना उत्तर दिले, “मोशेने तुम्हास काय आज्ञा दिली आहे?” ते म्हणाले, “मोशेने पुरुषाला सूटपत्र लिहिण्याची व असे करून आपल्या पत्नीला सोडण्याची परवानगी दिली आहे.”
मार्क 10:2-4 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
काही परूशी आले आणि त्यांची परीक्षा पाहण्याकरिता विचारले, “एखाद्या मनुष्याने त्याच्या पत्नीला घटस्फोट देणे कायदेशीर आहे काय?” त्यांनी उत्तर दिले, “मोशेने तुम्हाला काय आज्ञा दिली आहे?” ते म्हणाले, “पत्नीला सूटपत्र लिहिल्यानंतर तिला जाऊ द्यावे अशी परवानगी मोशेने पुरुषांना दिली आहे.”
मार्क 10:2-4 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
परूशी तेथे आले आणि त्याची परीक्षा पाहण्याच्या उद्देशाने त्यांनी त्याला विचारले की, “पुरुषाने बायको टाकणे सशास्त्र आहे काय?” उत्तरादाखल तो म्हणाला, “मोशेने तुम्हांला काय आज्ञा दिली आहे?” ते म्हणाले, “सूटपत्र देऊन तिला टाकण्याची मोशेने परवानगी दिली आहे.”
मार्क 10:2-4 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
काही परुशी त्याच्याकडे आले आणि त्याची परीक्षा पाहण्याच्या उद्देशाने त्यांनी त्याला विचारले, “पतीने पत्नीला सूटपत्र देणे धर्मशास्त्राला धरून आहे काय?” उत्तरादाखल तो म्हणाला, “मोशेने तुम्हांला कोणती आज्ञा दिली आहे?” ते म्हणाले, “सूटपत्र देऊन तिला सोडून देण्याची मोशेने परवानगी दिली आहे.”