मीखा 4:11-13
मीखा 4:11-13 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
आता पुष्कळ राष्ट्रे तुझ्याविरुद्ध जमा झाली आहेत, ती म्हणतात, ती भ्रष्ट होवो, आमचे डोळे सीयोनेला पाहून निवोत.” पण त्यांना परमेश्वराचे विचार कळत नाहीत, त्याचे संकल्प ते समजत नाहीत; कारण खळ्यासाठी पेंढ्या गोळा करतात तसे त्याने त्यांना गोळा केले आहे. सीयोनकन्ये, ऊठ, मळणी कर; मी तुझे शिंग लोखंडासारखे व तुझे खूर पितळेसारखे करतो; तू अनेक राष्ट्रांचा चुराडा करशील, त्यांची कमाई परमेश्वराला वाहशील, त्यांची संपत्ती सकल पृथ्वीच्या प्रभूला तू वाहशील.
मीखा 4:11-13 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आता पुष्कळ राष्ट्रे तुझ्याविरुध्द गोळा झाली आहेत. ती म्हणतात, “ती भ्रष्ट करण्यात येवो; आणि आमचे डोळे सियोनेवर तृप्त होवोत.” संदेष्टा म्हणतो, त्यांना परमेश्वराचे विचार कळत नाहीत, आणि त्यांना त्याच्या योजना समजत नाहीत. कारण जशा पेंढ्या खळ्यात गोळा करतात तसे परमेश्वराने त्यांना गोळा केले आहे. परमेश्वर म्हणतो, “सियोनेच्या कन्ये, ऊठ आणि मळणी कर, मी तुला लोखंडाची शिंगे व कास्याचे खूर करीन. तू पुष्कळ लोकांचा चुराडा करशील. मी त्यांची संपत्ती परमेश्वरास आणि त्यांचे धन जगाच्या प्रभूला समर्पित करीन.”