मत्तय 7:9-11
मत्तय 7:9-11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तुमच्यामध्ये कोण मनुष्य असा आहे, जो आपल्या मुलाने भाकर मागितली तर त्यास दगड देईल? किंवा त्याने मासा मागितला असता, त्याऐवजी त्यास साप देईल? वाईट असूनही जर तुम्हास आपल्या मुलांना चांगल्या गोष्टी देण्याचे कळते तर तुमच्या स्वर्गातील पित्याकडे जे मागतात, त्यांच्या गरजा तो किती चांगल्या प्रकारे भागवील?
मत्तय 7:9-11 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“तुम्हामध्ये असा कोण आहे जर तुमच्या मुलाने भाकर मागितली, तर त्याला दगड देईल? किंवा मासा मागितला, तर साप देईल? जर तुम्ही वाईट असूनही तुमच्या लेकरांना चांगल्या देणग्या देण्याचे तुम्हाला समजते, तर मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात, त्यांना ते चांगल्या देणग्या किती विशेषकरून देतील?
मत्तय 7:9-11 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
आपल्या मुलाने भाकर मागितली तर त्याला धोंडा देईल आणि मासा मागितला तर त्याला साप देईल, असा तुमच्यात कोण माणूस आहे? मग तुम्ही वाईट असताना आपल्या मुलाबाळांना चांगल्या देणग्या देणे तुम्हांला समजते, तर तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ जे मागतात त्यांना तो किती विशेषेकरून चांगल्या देणग्या देईल?
मत्तय 7:9-11 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
आपल्या मुलाने भाकर मागितल्यावर त्याला दगड देणारा आणि मासा मागितल्यावर त्याला साप देणारा असा कोणी तुमच्यामध्ये आहे का? मग तुम्ही वाईट असताना आपल्या मुलाबाळांना चांगल्या देणग्या देणे तुम्हांला समजते, तर तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ जे मागतात, त्यांना तो किती मोठ्या प्रमाणात चांगल्या देणग्या देईल!