YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 7:21-27

मत्तय 7:21-27 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

मला ‘प्रभूजी, प्रभूजी’ असे म्हणणार्‍या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही; तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल. त्या दिवशी पुष्कळ जण मला म्हणतील, ‘प्रभो, प्रभो, आम्ही तुझ्या नावाने संदेश दिला, तुझ्या नावाने भुते घालवली व तुझ्या नावाने पुष्कळ महत्कृत्ये केली नाहीत काय?’ तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेन की, ‘मला तुमची कधीच ओळख नव्हती; अहो अनाचार करणार्‍यांनो, माझ्यापुढून निघून जा.’ ह्यास्तव जो प्रत्येक जण ही माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागतो तो कोणाएका सुज्ञ मनुष्यासारखा ठरेल; त्याने आपले घर खडकावर बांधले; मग पाऊस पडला, पूर आला, वाराही सुटला, व त्या घरास लागला; तरी ते पडले नाही, कारण त्याचा पाया खडकावर घातला होता. तसेच जो कोणी माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागत नाही तो कोणाएका मूर्ख मनुष्यासारखा ठरेल; त्याने आपले घर वाळूवर बांधले; मग पाऊस पडला, पूर आला, वाराही सुटला, व त्या घरास लागला; तेव्हा ते पडले, अगदी कोसळून पडले.”

सामायिक करा
मत्तय 7 वाचा

मत्तय 7:21-27 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

मला प्रभू, प्रभू म्हणणारा प्रत्येकजण स्वर्गाच्या राज्यात जाईलच असे नाही; तर माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे जो वागतो त्याचाच प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल. त्यादिवशी मला अनेक जण म्हणतील, हे प्रभू, आम्ही तुझ्या नावाने संदेश दिले, तुझ्या नावाने भूते काढली व तुझ्या नावाने पुष्कळ चमत्कार केले नाहीत काय? तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेन की, मी तुम्हास ओळखत नाही. अहो दुराचार करणाऱ्यांनो, माझ्यापासून चालते व्हा. जो कोणी माझ्या सांगण्याप्रमाणे आचारण करतो तो शहाण्या मनुष्यासारखा आहे, अशा शहाण्या मनुष्याने आपले घर खडकावर बांधले. मग जोराचा पाऊस झाला आणि पूर आला. जोराचा वारा आला. वादळात घर सापडले, पण ते पडले नाही कारण त्याचा पाया खडकावर बांधला होता. जो कोणी माझीही वचने ऐकून त्याप्रमाणे आचरण करीत नाही तो कोणाएका मूर्ख मनुष्यासारखा आहे, त्याने आपले घर वाळूवर बांधले. मग जोराचा पाऊस आला आणि पूर आला. जोराचा वारा सुटला. वादळवाऱ्यात ते घर सापडले आणि कोसळून पडले.”

सामायिक करा
मत्तय 7 वाचा

मत्तय 7:21-27 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

“जो कोणी मला, ‘प्रभुजी, प्रभुजी’ म्हणत राहतो, तो प्रत्येकजण स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करील असे नाही, तर जो कोणी माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे करतो, तोच स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करील. त्या दिवशी पुष्कळ जण मला म्हणतील, ‘प्रभुजी, प्रभुजी आम्ही तुमच्या नावाने भविष्यवाणी केली नाही काय, तुमच्या नावाने भुते घालविली नाहीत काय, तुमच्या नावाने मोठे चमत्कार केले नाहीत काय?’ तेव्हा मी त्यांना स्पष्टपणे सांगेन, ‘मी तुम्हाला कधीच ओळखले नाही. अहो दुष्टांनो, माझ्यापासून दूर निघून जा.’ “यास्तव माझी शिकवण ऐकणारे व त्याप्रमाणे वागणारे सर्वजण एका शहाण्या मनुष्यासारखे आहेत. त्याने आपले घर खडकावर बांधले. मग पाऊस पडला, पूर आला, वारेही सुटले आणि त्या घरावर जोराने आदळले; तरी ते पडले नाही, कारण त्याचा पाया खडकावर घातला होता. जो कोणी माझी वचने ऐकतो पण ती आपल्या आचरणात आणत नाही, तो पाया न घालता आपले घर वाळूवर बांधण्यार्‍या मूर्ख माणसासारखा आहे. मग पाऊस पडला, पूर आला, वारेही सुटले आणि त्या घरावर जोराने आदळले आणि ते घर कोसळून पडले.”

सामायिक करा
मत्तय 7 वाचा

मत्तय 7:21-27 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

‘प्रभो, प्रभो’, म्हणून माझा धावा करणारा प्रत्येक जण स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करील असे नाही, पण जो माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो तो करील. न्यायाच्या दिवशी पुष्कळ जण मला म्हणतील, “प्रभो, प्रभो, आम्ही तुझ्या नावाने संदेश दिला, तुझ्या नावाने भुते घालवली व तुझ्या नावाने पुष्कळ महत्कृत्ये केली नाहीत काय?’ तेव्हा मी त्यांना जाहीरपणे सांगेन, “मी तुम्हांला मुळीच ओळखत नाही. अनाचार करणाऱ्यांनो, माझ्यापुढून निघून जा.’ म्हणून जो कोणी माझी ही वचने ऐकून त्याप्रमाणे वागतो, तो खडकावर घर बांधणाऱ्या सुज्ञ मनुष्यासारखा आहे; पाऊस पडला; पूर आला; वाराही सुटला व त्या घरावर आदळला, तरी ते पडले नाही कारण त्याचा पाया खडकावर घातलेला होता. उलट, जो कोणी माझी ही वचने ऐकून त्याप्रमाणे वागत नाही, तो वाळूवर घर बांधणाऱ्या मनुष्याप्रमाणे मूर्ख ठरतो. पाऊस पडला; पूर आला; वाराही सुटला व त्या घरावर आदळला; ते घर कोसळले आणि त्याचा नाश भयानक होता.”

सामायिक करा
मत्तय 7 वाचा