मत्तय 5:6-9
मत्तय 5:6-9 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
जे नीतिमत्त्वाचे भुकेले व तान्हेले ते धन्य, कारण ते तृप्त होतील. जे दयाळू ते धन्य, कारण त्यांच्यावर दया होईल. ‘जे अंत:करणाचे शुद्ध’ ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. जे शांती करणारे ते धन्य, कारण त्यांना देवाची मुले म्हणतील.
मत्तय 5:6-9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जे न्यायीपणाचे भुकेले व तान्हेले ते धन्य आहेत, कारण ते संतुष्ट होतील. जे दयाळू ते धन्य आहेत, कारण त्यांच्यावर दया करण्यात येईल. जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य आहेत, कारण ते देवाला पाहतील. जे शांती करणारे ते धन्य आहेत, कारण त्यांना देवाची मुले म्हणतील.
मत्तय 5:6-9 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
ज्यांना नीतिमत्वाची तहान व भूक लागली आहे ते धन्य कारण ते तृप्त केले जातील. धन्य ते, जे दयाळू आहेत, कारण त्यांना दयाळूपणाने वागविले जाईल. धन्य ते, जे शुद्ध हृदयाचे आहेत, कारण त्यांना परमेश्वराचे दर्शन घडेल. धन्य ते, जे शांती प्रस्थापित करतात, कारण ते परमेश्वराचे लोक म्हणून ओळखण्यात येतील.
मत्तय 5:6-9 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
ज्यांना नीतिमत्त्वाची भूक व तहान लागलेली आहे ते धन्य, कारण ते तृप्त होतील. जे दयाळू ते धन्य, कारण त्यांना दया मिळेल. जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. जे शांती प्रस्थापित करण्यासाठी झटतात ते धन्य, कारण त्यांना देवाची मुले म्हटले जाईल.