मत्तय 5:23-24
मत्तय 5:23-24 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
यास्तव तू आपले अर्पण वेदीवर अर्पिण्यास आणीत असता आपल्या भावाच्या मनात आपल्याविरूद्ध काही आहे अशी तुला तेथे आठवण झाली, तर आपले अर्पण तसेच वेदीसमोर ठेव आणि आपल्या मार्गाने परत जा व प्रथम आपल्या भावासोबत समेट कर आणि मग येऊन आपले अर्पण वेदीवर अर्पण कर.
मत्तय 5:23-24 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“यास्तव, जर तुम्ही वेदीवर भेट अर्पण करीत आहात आणि तेथे तुम्हाला आठवले की, तुझ्या बंधू किंवा भगिनीच्या मनात तुमच्याविरुद्ध काही आहे, तर तुमची भेट तेथेच वेदीपुढे ठेवा. पहिले जाऊन त्यांच्याबरोबर समेट करा आणि मग येऊन आपली भेट अर्पण करा.
मत्तय 5:23-24 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ह्यास्तव तू आपले दान अर्पण करण्यास वेदीजवळ आणत असता आपल्या भावाच्या मनात आपल्याविरुद्ध काही आहे असे तुला स्मरण झाले, तर तेथेच वेदीपुढे आपले दान तसेच ठेव आणि निघून जा; प्रथम आपल्या भावाबरोबर समेट कर, मग येऊन आपले दान अर्पण कर.
मत्तय 5:23-24 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
तर मग तू आपले दान अर्पण करण्याकरता वेदीजवळ आणत असता तुझ्या भावाच्या मनात तुझ्याविरुद्ध काही आहे, असे तुला आठवले, तर तेथे वेदीपुढे तुझे दान तसेच ठेव आणि निघून जा. प्रथम तुझ्या भावाबरोबर समेट कर व नंतर येऊन तुझे दान अर्पण कर.