मत्तय 4:20-22
मत्तय 4:20-22 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग ते लगेचच जाळे सोडून देऊन त्याच्यामागे चालू लागले. येशू तेथून पुढे चालत जात असता त्याने दुसरे दोघे भाऊ; जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान यांना त्यांचे वडील जब्दी याच्याबरोबर होडीत पाहीले. ते जाळे नीट करत होते. त्याने त्यांना बोलावले, तेव्हा ते दोघेही लगेचच आपली होडी व आपले वडील यांना सोडून त्याच्यामागे गेले.
मत्तय 4:20-22 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
लगेच त्यांनी त्यांची जाळी सोडली आणि ते त्यांच्यामागे गेले. किनार्यावरून पुढे गेल्यावर त्यांनी आणखी दोन भाऊ, म्हणजे जब्दीचे पुत्र, याकोब व त्याचा भाऊ योहान यांना पाहिले. ते आपल्या वडिलांसह होडीत बसून आपली जाळी तयार करत होते. येशूंनी त्यांनाही हाक मारून बोलावले, आणि ताबडतोब त्यांनी नाव व आपला पिता यांना सोडून त्यांच्यामागे गेले.
मत्तय 4:20-22 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
लगेच ते जाळी सोडून देऊन त्याला अनुसरले. तेथून पुढे गेल्यावर त्याने दुसरे दोघे भाऊ म्हणजे जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान ह्यांना आपला बाप जब्दी ह्याच्याबरोबर तारवात आपली जाळी नीट करताना पाहिले, आणि त्याने त्यांना बोलावले. मग लगेच ते तारू व आपला बाप ह्यांना मागे सोडून त्याला अनुसरले.
मत्तय 4:20-22 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
ते लगेच त्यांची जाळी सोडून त्याच्यामागे निघाले. तेथून पुढे गेल्यावर त्याने दुसरे दोघे भाऊ म्हणजे, जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान ह्यांना त्यांच्या वडिलांबरोबर तारवात त्यांची जाळी नीट करताना पाहिले. येशूने त्यांनाही बोलावले. त्यांच्या वडिलांना तारवात सोडून ते येशूच्या मागे गेले.