YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 4:18-22

मत्तय 4:18-22 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

नंतर तो गालीलच्या सरोवराजवळून जात असता, पेत्र म्हटलेला शिमोन व त्याचा भाऊ अंद्रिया या दोघांना त्याने जाळे टाकतांना पाहिले कारण ते मासे पकडणारे होते. येशू त्यांना म्हणाला, “माझ्यामागे या, म्हणजे मी तुम्हास माणसे धरणारे करीन.” मग ते लगेचच जाळे सोडून देऊन त्याच्यामागे चालू लागले. येशू तेथून पुढे चालत जात असता त्याने दुसरे दोघे भाऊ; जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान यांना त्यांचे वडील जब्दी याच्याबरोबर होडीत पाहीले. ते जाळे नीट करत होते. त्याने त्यांना बोलावले, तेव्हा ते दोघेही लगेचच आपली होडी व आपले वडील यांना सोडून त्याच्यामागे गेले.

सामायिक करा
मत्तय 4 वाचा

मत्तय 4:18-22 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

येशू गालील सरोवराच्या जवळून चालत असताना, त्यांनी शिमोन ज्याचे नाव पेत्र असेही होते आणि त्याचा भाऊ आंद्रिया यांना जाळे टाकताना पाहिले. ते सरोवरात जाळे टाकीत होते, कारण ते मासे धरणारे होते. येशू त्यांना म्हणाले, “चला माझ्यामागे या म्हणजे मी तुम्हाला माणसे धरणारे करीन.” लगेच त्यांनी त्यांची जाळी सोडली आणि ते त्यांच्यामागे गेले. किनार्‍यावरून पुढे गेल्यावर त्यांनी आणखी दोन भाऊ, म्हणजे जब्दीचे पुत्र, याकोब व त्याचा भाऊ योहान यांना पाहिले. ते आपल्या वडिलांसह होडीत बसून आपली जाळी तयार करत होते. येशूंनी त्यांनाही हाक मारून बोलावले, आणि ताबडतोब त्यांनी नाव व आपला पिता यांना सोडून त्यांच्यामागे गेले.

सामायिक करा
मत्तय 4 वाचा

मत्तय 4:18-22 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

नंतर गालील समुद्राजवळून येशू चालला असताना त्याने पेत्र म्हटलेला शिमोन व त्याचा भाऊ अंद्रिया ह्या दोघा भावांना समुद्रात पाग टाकताना पाहिले; कारण ते मासे धरणारे होते. त्याने त्यांना म्हटले, “माझ्यामागे या म्हणजे मी तुम्हांला माणसे धरणारे करीन.” लगेच ते जाळी सोडून देऊन त्याला अनुसरले. तेथून पुढे गेल्यावर त्याने दुसरे दोघे भाऊ म्हणजे जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान ह्यांना आपला बाप जब्दी ह्याच्याबरोबर तारवात आपली जाळी नीट करताना पाहिले, आणि त्याने त्यांना बोलावले. मग लगेच ते तारू व आपला बाप ह्यांना मागे सोडून त्याला अनुसरले.

सामायिक करा
मत्तय 4 वाचा

मत्तय 4:18-22 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

येशू गालील समुद्राजवळून चालला असताना त्याने पेत्र ऊर्फ शिमोन व त्याचा भाऊ अंद्रिया ह्या दोघा भावांना समुद्रात जाळे टाकताना पाहिले. कारण ते कोळी होते. त्याने त्यांना म्हटले, “माझ्यामागे या म्हणजे मी तुम्हांला माणसे धरणारे करीन.” ते लगेच त्यांची जाळी सोडून त्याच्यामागे निघाले. तेथून पुढे गेल्यावर त्याने दुसरे दोघे भाऊ म्हणजे, जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान ह्यांना त्यांच्या वडिलांबरोबर तारवात त्यांची जाळी नीट करताना पाहिले. येशूने त्यांनाही बोलावले. त्यांच्या वडिलांना तारवात सोडून ते येशूच्या मागे गेले.

सामायिक करा
मत्तय 4 वाचा