मत्तय 3:16-17
मत्तय 3:16-17 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग येशूंचा बाप्तिस्मा झाल्यावर, येशू पाण्यातून वर आले आणि पाहा, त्यांच्यासाठी आकाश उघडले; तेव्हा त्यांनी देवाच्या आत्म्याला कबुतरासारखे उतरताना व आपणावर येताना पाहीले, आणि आकाशातून वाणी झाली की, “हा माझा प्रिय ‘पुत्र’ आहे, याच्याविषयी मी फार संतुष्ट आहे.”
मत्तय 3:16-17 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
येशूंचा बाप्तिस्मा झाल्याबरोबर ते पाण्यातून वर आले. त्याक्षणीच स्वर्ग उघडला आणि त्यांनी परमेश्वराचा आत्मा कबुतरासारखा आपल्यावर उतरताना आणि स्थिरावताना पाहिला; आणि स्वर्गातून वाणी झाली, “तू माझा पुत्र, माझा प्रिय; तुझ्यावर मी संतुष्ट आहे.”
मत्तय 3:16-17 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग बाप्तिस्मा घेतल्यावर येशू लगेच पाण्यातून वर आला आणि पाहा, आकाश उघडले, तेव्हा त्याने परमेश्वराचा आत्मा कबुतरासारखा उतरताना व आपणावर येताना पाहिला, आणि पाहा, आकाशातून अशी वाणी झाली की, “हा माझा ‘पुत्र’, मला ‘परमप्रिय आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे.”’
मत्तय 3:16-17 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
बाप्तिस्मा घेतल्यावर लगेच येशू पाण्यातून वर येत असताना, पाहा, स्वर्ग उघडला आणि त्याला दिसले की, परमेश्वराचा आत्मा कबुतरासारखा त्याच्यावर उतरत आहे आणि काय आश्चर्य! आकाशातून अशी वाणी झाली, “हा माझा परमप्रिय पुत्र आहे, त्याच्यावर मी प्रसन्न आहे.”