YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 3:13-16

मत्तय 3:13-16 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

यानंतर येशू गालील प्रांताहून यार्देन नदीवर योहानाच्या हातून बाप्तिस्मा घेण्याकरीता त्याच्याकडे आला; परंतु योहान त्यास थांबवत म्हणाला, मला आपल्या हातून बाप्तिस्मा घेण्याची गरज आहे, असे असता आपण माझ्याकडे येता हे कसे? येशूने त्यास उत्तर दिले, “आता हे होऊ दे; कारण याप्रकारे सर्व न्यायीपण पूर्णपणे करणे हे आपणास योग्य आहे.” तेव्हा त्याने ते होऊ दिले. मग येशूंचा बाप्तिस्मा झाल्यावर, येशू पाण्यातून वर आले आणि पाहा, त्यांच्यासाठी आकाश उघडले; तेव्हा त्यांनी देवाच्या आत्म्याला कबुतरासारखे उतरताना व आपणावर येताना पाहीले

सामायिक करा
मत्तय 3 वाचा

मत्तय 3:13-16 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

तेव्हा योहानाकडून बाप्तिस्मा घ्यावा यासाठी येशू गालील प्रांतामधून यार्देन नदीवर आले. पण योहान त्यांना नकार देत म्हणाला, “वास्तविक मीच तुमच्या हातून बाप्तिस्मा घेतला पाहिजे, मग तुम्ही माझ्याकडे बाप्तिस्मा घेण्‍यास का आलात?” येशू त्याला म्हणाले, “आता असेच होऊ दे, कारण सर्व नीतिमत्व अशाप्रकारे पूर्ण करणे आपल्याला योग्य आहे.” तेव्हा योहानाने त्यांचा बाप्तिस्मा केला. येशूंचा बाप्तिस्मा झाल्याबरोबर ते पाण्यातून वर आले. त्याक्षणीच स्वर्ग उघडला आणि त्यांनी परमेश्वराचा आत्मा कबुतरासारखा आपल्यावर उतरताना आणि स्थिरावताना पाहिला

सामायिक करा
मत्तय 3 वाचा