मत्तय 27:32-34
मत्तय 27:32-34 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ते बाहेर जात असता शिमोन नावाचा कोणीएक कुरेनेकर मनुष्य त्यांना आढळला; त्याला त्यांनी त्याचा वधस्तंभ वाहण्याकरता वेठीस धरले. मग गुलगुथा नावाची जागा, म्हणजे कवटीची जागा, येथे येऊन पोचल्यावर त्यांनी त्याला ‘पित्तमिश्रित द्राक्षारस पिण्यास दिला,’ परंतु तो चाखून पाहिल्यावर तो पिईना.
मत्तय 27:32-34 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
ते बाहेर जात असता त्यांना एक शिमोन कुरनेकर नावाचा मनुष्य भेटला. त्यांनी त्यास धरून त्याचा वधस्तंभ वाहायला लावले. जेव्हा ते गुलगुथा “म्हणजे कवटीची जागा” नावाच्या ठिकाणी आले. तेव्हा त्यांनी त्यास पित्तमिश्रित द्राक्षरस प्यायला दिला. त्याने तो चाखला. पण पिण्यास नकार दिला.
मत्तय 27:32-34 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
ते त्यांना घेऊन क्रूसावर खिळण्याच्या जागेकडे निघाले. वाटेत त्यांना कुरेने गावचा शिमोन नावाचा मनुष्य भेटला. त्यांनी त्याला जबरदस्तीने क्रूस वाहण्यास भाग पाडले. मग ते गोलगोथा या नावाने ओळखल्या जाणार्या जागी आले. गोलगोथाचा अर्थ “कवटीची जागा”. त्या ठिकाणी त्यांना पित्त मिसळलेला द्राक्षारस प्यावयास दिला. परंतु त्यांनी तो चाखून पाहिल्यावर घेतला नाही.
मत्तय 27:32-34 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ते बाहेर जात असता शिमोन नावाचा कोणीएक कुरेनेकर मनुष्य त्यांना आढळला; त्याला त्यांनी त्याचा वधस्तंभ वाहण्याकरता वेठीस धरले. मग गुलगुथा नावाची जागा, म्हणजे कवटीची जागा, येथे येऊन पोचल्यावर त्यांनी त्याला ‘पित्तमिश्रित द्राक्षारस पिण्यास दिला,’ परंतु तो चाखून पाहिल्यावर तो पिईना.
मत्तय 27:32-34 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
ते बाहेर जात असता शिमोन नावाचा एक कुरेनेकर मनुष्य त्यांना दिसला. त्याला शिपायांनी येशूचा क्रुस वाहायला भाग पाडले. ते गुलगुथा म्हणजे कवटीचे ठिकाण म्हटलेल्या जागी आले. तेथे त्यांनी येशूला विनेगर मिसळलेला द्राक्षारस प्यायला दिला, परंतु तो चाखून पाहिल्यावर त्याने तो घेतला नाही.