मत्तय 27:19-22
मत्तय 27:19-22 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तो न्यायासनावर बसला असतानाच त्याच्या पत्नीने त्यास एक निरोप पाठवून कळवले, “या मनुष्याविषयी सावध राहा; कारण तो दोषी नाही. त्याच्यामुळे स्वप्नात मला आज दिवसभर फार दुःखसहन करावे लागले आहे.” पण पिलाताने बरब्बाला सोडून द्यावे व येशूला जिवे मारावे अशी मागणी लोकांनी करावी म्हणून मुख्य याजकांनी व वडीलजनांनी लोकसमुदायाचे मन वळवले. राज्यपालाने त्यांना विचारले, “मी या दोघांतून तुमच्यासाठी कोणाला सोडून द्यावे अशी तुमची इच्छा आहे?” लोकांनी उत्तर दिले, “बरब्बाला.” पिलाताने विचारले, “मग ज्याला ख्रिस्त म्हणतात त्या येशूचे मी काय करावे?” सर्व लोक ओरडून म्हणाले, “त्याला वधस्तंभावर खिळून मारून टाका!”
मत्तय 27:19-22 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
त्याचवेळी, पिलात न्यायासनावर बसला असतानाच, त्याच्या पत्नीने त्याला निरोप पाठविला, “त्या निर्दोष माणसाच्या विरुद्ध जाऊ नका, कारण आज स्वप्नात मी त्याच्यामुळे फार दुःख भोगले आहे.” परंतु तोपर्यंत प्रमुख याजकांनी व वडील यांनी “बरब्बाला सोडा अशी मागणी करून येशूंना जिवे मारावे.” म्हणून समुदायाचे मन वळविले. राज्यपालांनी विचारले, “या दोघांपैकी मी तुम्हाकरिता कोणाला सोडावे, अशी तुमची इच्छा आहे?” जमावाने उत्तर दिले, “बरब्बाला सोडावे!” “मग ख्रिस्त जो येशू यांचे मी काय करावे?” पिलाताने विचारले. “त्याला क्रूसावर खिळा,” लोक मोठ्याने ओरडले.
मत्तय 27:19-22 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तो न्यायासनावर बसला असता त्याच्या पत्नीने त्याला निरोप पाठवला की, “त्या नीतिमान मनुष्याच्या बाबीत आपण पडू नये; कारण आज स्वप्नात त्याच्यामुळे मला फार यातना झाल्या.” इकडे मुख्य याजक व वडील ह्यांनी बरब्बाला मागून घ्यावे व येशूचा नाश करावा, म्हणून लोकसमुदायाचे मन वळवले. सुभेदाराने त्यांना विचारले, “तुमच्याकरता ह्या दोघांतून कोणाला सोडून द्यावे अशी तुमची इच्छा आहे?” ते म्हणाले, “बरब्बाला.” पिलाताने त्यांना म्हटले, “तर ख्रिस्त म्हटलेल्या येशूचे मी काय करावे?” सर्व म्हणाले, “त्याला वधस्तंभावर खिळून टाका.”
मत्तय 27:19-22 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
तो न्यायासनावर बसला असता त्याच्या पत्नीने त्याला निरोप पाठवला, “त्या निर्दोष मनुष्याच्या बाबतीत आपण मध्ये पडू नये; कारण आज स्वप्नात त्याच्यामुळे मला फार यातना झाल्या.’ इकडे मुख्य याजक व वडीलजन ह्यांनी बरब्बाला मागून घ्यावे व येशूला मरणदंड मिळावा म्हणून लोकसमुदायाचे मन वळवले. परंतु राज्यपालांनी त्यांना विचारले, “तुमच्याकरता ह्या दोघांतून कोणाला सोडून द्यावे, अशी तुमची इच्छा आहे?” ते म्हणाले, “बरब्बाला.” पिलातने त्यांना विचारले, “तर मग ख्रिस्त म्हटलेल्या येशूचे मी काय करावे?” सर्व म्हणाले, “त्याला क्रुसावर खिळा.”