मत्तय 26:57-58
मत्तय 26:57-58 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
येशूंना अटक करून त्यांना महायाजक कयफा याच्याकडे नेले; त्या ठिकाणी सर्व वडीलजन आणि नियमशास्त्र शिक्षक एकत्र झाले होते. परंतु पेत्र काही अंतरावरून त्यांच्यामागे चालत, महायाजकाच्या अंगणात आला. त्याने प्रवेश केला आणि पहारेकर्यांसोबत जाऊन काय होते ते पाहत बसला.
मत्तय 26:57-58 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
त्या लोकांनी येशूला धरले, त्यांनी त्यास महायाजक कयफा याच्या घरी नेले. तेथे नियमशास्त्राचे शिक्षक आणि वडीलजन एकत्र जमले होते. पेत्र काही अंतर ठेवून येशूच्या मागे चालला होता. पेत्र येशूच्या मागे महायाजकाच्या आवारापर्यंत गेला आणि जाऊन शेकत बसला, काय होते ते पाहण्यासाठी कामदारांसोबत बसला.
मत्तय 26:57-58 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग येशूला अटक करणार्यांनी त्याला प्रमुख याजक कयफा ह्याच्याकडे शास्त्री व वडील जमले होते तेथे नेले. पण पेत्र प्रमुख याजकाच्या वाड्यापर्यंत दुरून त्याच्या मागेमागे चालत गेला व आत जाऊन, शेवट काय होतो हे पाहण्यास कामदारांमध्ये बसला.
मत्तय 26:57-58 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
येशूला अटक करणाऱ्यांनी त्याला उच्च याजक कयफा ह्यांच्याकडे नेले. तेथे शास्त्री व वडीलजन जमले होते. परंतु पेत्र त्याच्यामागे काही अंतर ठेवून उच्च याजकांच्या वाड्यापर्यंत गेला व आत जाऊन शेवट काय होतो, हे पाहायला कामगारांमध्ये जाऊन बसला.