मत्तय 26:47-50
मत्तय 26:47-50 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
येशू हे बोलत असतानाच बारा जणांपैकी एक जो यहूदा, तो तेथे आला. त्याच्याबरोबर बरेच लोक होते. मुख्य याजक लोक आणि वडीलजन यांनी त्यांना पाठवले होते. ते लोक तलवारी व सोटे घेऊन आले होते. आणि त्यास धरून देणार्याने त्यांना खूण देऊन म्हणले होते की, मी ज्याचे चुंबन घेईन तोच तो आहे, त्यास तुम्ही धरा, मग यहूदा येशूकडे गेला आणि म्हणाला, “रब्बी,” आणि यहूदाने येशूचे चुंबन घेतले. येशू त्यास म्हणाला, “मित्रा, जे करण्यास आलास ते कर.” मग ते येशूकडे आले. त्यांनी येशूवर हात टाकले व त्यास धरले.
मत्तय 26:47-50 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
येशू बोलत आहे तोच, यहूदा, त्यांच्या बारा पैकी एक, तेथे पोहोचला. त्याच्याबरोबर मोठा जमाव तरवारी आणि सोटे घेऊन आला, जो प्रमुख याजक आणि वडीलजनांनी पाठविलेला होता. आता विश्वासघातक्याने जमावाला खूण देऊन ठेवली होती की, “ज्या मनुष्याचे मी चुंबन घेईन त्याला अटक करा.” तत्क्षणी यहूदा येशूंच्या जवळ गेला, “सलाम, रब्बी!” त्याने उद्गार काढले आणि त्यांचे चुंबन घेतले. येशू त्याला म्हणाले, “मित्रा, ज्या कामासाठी तू आला आहेस ते आटोपून घे.” मग लोकांनी येशूंना धरले आणि अटक केली.
मत्तय 26:47-50 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तो बोलत आहे इतक्यात, पाहा, बारा जणांतील एक जो यहूदा तो आला आणि त्याच्याबरोबर मुख्य याजक व लोकांचे वडील ह्यांच्याकडून तलवारी व सोटे घेऊन आलेला मोठा समुदाय होता. त्याला धरून देणार्याने त्यांना अशी खूण सांगून ठेवली होती की, “मी ज्याचे चुंबन घेईन तो तोच आहे, त्याला धरा.” मग त्याने लगेचच येशूजवळ येऊन, “गुरूजी, सलाम,” असे म्हणून त्याचे चुंबन घेतले. येशूने त्याला म्हटले, “गड्या, ज्यासाठी आलास ते कर.” तेव्हा त्यांनी जवळ येऊन येशूवर हात टाकून त्याला अटक केली.
मत्तय 26:47-50 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
येशू बोलत आहे इतक्यात, बारांमधील एक जण म्हणजे यहुदा आला. त्याच्याबरोबर मुख्य याजक व वडीलजन ह्यांच्याकडचा एक जमाव तलवारी व सोटे घेऊन आला होता. येशूला धरून देणाऱ्याने त्यांना अशी खूण सांगून ठेवली होती की, “मी ज्याचे चुंबन घेईन तोच तो आहे, त्याला धरा.’ यहुदाने लगेच येशूजवळ येऊन, “गुरुवर्य, नमस्कार”, असे म्हणून त्याचे चुंबन घेतले. येशूने त्याला म्हटले, “मित्रा, ज्याकरता तू आलास ते लवकर उरक.” तेव्हा त्यांनी जवळ येऊन येशूला धरले व त्याला अटक केली.