मत्तय 26:36-38
मत्तय 26:36-38 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
नंतर गेथशेमाने नावाच्या जागी येशू आपल्या शिष्यांसह गेला. येशू त्यांना म्हणाला, “मी थोडा पुढे जाऊन प्रार्थना करीपर्यंत येथेच थांबा.” येशूने पेत्र आणि जब्दीचे दोन पुत्र यांना आपल्याबरोबर यायला सांगितले. यानंतर येशू फार दुःखी व कासावीस होऊ लागला. येशू पेत्राला व जब्दीच्या दोघा पुत्रांना म्हणाला, “माझा जीव फार दुःखीत व मरणप्राय झाला आहे. येथे थांबा व माझ्याबरोबर जागे राहा.”
मत्तय 26:36-38 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मग येशू त्यांच्या सर्व शिष्यांसोबत गेथशेमाने नावाच्या ठिकाणी आले, आणि त्यांना ते म्हणाले, “मी पुढे जाऊन प्रार्थना करून येईपर्यंत येथे बसा.” मग त्यांनी पेत्र आणि जब्दीचे दोन पुत्र, याकोब व योहान, यांना बरोबर घेतले आणि ते अस्वस्थ आणि दुःखीकष्टी होऊ लागले. ते त्यांना म्हणाले, “मरणप्राय दुःखाने माझा आत्मा विव्हळ झाला आहे. तुम्ही येथेच थांबा आणि माझ्याबरोबर जागे राहा.”
मत्तय 26:36-38 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
नंतर येशू शिष्यांबरोबर गेथशेमाने नावाच्या ठिकाणी आला आणि त्यांना म्हणाला, “मी पुढे जाऊन प्रार्थना करीपर्यंत येथे बसा.” मग त्याने पेत्र व जब्दीचे दोघे मुलगे ह्यांना बरोबर घेतले आणि तो खिन्न व अति कष्टी होऊ लागला. तेव्हा त्याने त्यांना म्हटले, “‘माझा जीव’ मरणप्राय, ‘अति खिन्न झाला आहे,’ तुम्ही येथे थांबा व माझ्याबरोबर जागे राहा.”
मत्तय 26:36-38 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
नंतर येशू शिष्यांबरोबर गेथशेमाने नावाच्या ठिकाणी गेला आणि त्यांना म्हणाला, “मी पुढे जाऊन प्रार्थना करीपर्यंत येथे बसा.” त्याने पेत्र व जब्दीचे दोघे मुलगे ह्यांना बरोबर घेतले. तो दुःखी व व्याकूळ होऊ लागला. “माझ्या जिवाला मरणप्राय वेदना होत आहेत. तुम्ही येथे थांबून माझ्याबरोबर जागे राहा”, असे बोलून