मत्तय 26:17-21
मत्तय 26:17-21 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
बेखमीर भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशी येशूचे शिष्य त्याच्याकडे आले. ते म्हणाले, “आम्ही आपल्यासाठी वल्हांडणाचे जेवण कोठे करावे अशी आपली इच्छा आहे?” येशू म्हणाला, “तुम्ही नगरात अमुक मनुष्याकडे जा आणि त्यास सांगा; ‘गुरूजी म्हणतात, माझी वेळ जवळ आली आहे. तुझ्या घरी मी माझ्या शिष्यांसह वल्हांडण साजरा करणार आहे.” येशूने जे सांगितले होते ते त्याच्या शिष्यांनी केले आणि त्यांनी वल्हांडण सणाचे जेवण तयार केले. संध्याकाळ झाल्यावर येशू आपल्या शिष्यांबरोबर जेवावयास बसला. जेवण करीत असता येशू म्हणाला, “मी तुम्हास खरे सांगतो तुमच्यातला एकजण माझा विश्वासघात करील.”
मत्तय 26:17-21 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
बेखमीर भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशी शिष्य येशूंकडे आले आणि त्यांनी त्यांना विचारले, “गुरुजी, वल्हांडणाच्या भोजनाची तयारी आम्ही कोठे करावी?” येशूंनी उत्तर दिले, “शहरात जा आणि या एका माणसाची भेट घ्या. त्याला सांगा की, ‘गुरुजी म्हणतात: माझी नेमलेली वेळ जवळ आली आहे. मी माझ्या शिष्यांबरोबर वल्हांडणाचे भोजन तुझ्या घरी करीन.’ ” येशूंनी सांगितल्याप्रमाणे शिष्यांनी केले आणि वल्हांडणाच्या भोजनाची तयारी केली. संध्याकाळ झाल्यावर येशू आपल्या बारा शिष्यांबरोबर बसले होते. आणि ते भोजन करीत असताना येशू म्हणाले, “मी तुम्हाला निश्चित सांगतो की तुमच्यापैकी एकजण माझा विश्वासघात करेल.”
मत्तय 26:17-21 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
नंतर बेखमीर भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशी शिष्य येशूकडे येऊन म्हणाले, “आपणाकरता वल्हांडणाच्या भोजनाची तयारी आम्ही कोठे करावी म्हणून आपली इच्छा आहे?” त्याने म्हटले, “नगरात अमुक एका माणसाकडे जाऊन त्याला सांगा की, ‘गुरूजी म्हणतात, माझी वेळ जवळ आली आहे, मी आपल्या शिष्यांसह तुमच्या येथे वल्हांडण सण करतो.”’ मग येशूने सांगितल्याप्रमाणे शिष्यांनी जाऊन वल्हांडणाची तयारी केली. संध्याकाळ झाल्यावर तो बारा शिष्यांसह भोजनास बसला; आणि ते भोजन करत असताना त्याने म्हटले, “मी तुम्हांला खचीत सांगतो, तुमच्यातला एक जण मला धरून देईल.”
मत्तय 26:17-21 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
बेखमीर भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशी शिष्य येशूला विचारू लागले, “आपणाकरता ओलांडण सणाचे भोजन आम्ही कोठे तयार करावे, अशी आपली इच्छा आहे?” त्याने म्हटले, “नगरात अमुक एका माणसाकडे जाऊन त्याला सांगा की, गुरुजी म्हणतात, “माझी वेळ येऊन ठेपली आहे. मी बारा जणांबरोबर तुमच्या येथे ओलांडण सण साजरा करीन.’” म्हणून येशूने सांगितल्याप्रमाणे शिष्यांनी जाऊन ओलांडण सणाचे भोजन तयार केले. संध्याकाळ झाल्यावर तो बारा जणांबरोबर भोजनास बसला. ते भोजन करत असताना त्याने म्हटले, “मी तुम्हांला ठामपणे सांगतो, तुमच्यापैकी एक जण माझा विश्वासघात करील.”