मत्तय 25:23-25
मत्तय 25:23-25 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मालक म्हणाला, शाब्बास, चांगल्या आणि विश्वासू दासा, तू भरंवसा ठेवण्यायोग्य चाकर आहेस, तू थोड्या नाण्यांविषयी इमानीपणे वागलास, म्हणून मी पुष्कळावर तुझी नेमणूक करीन. आत जा आणि आपल्या मालकाच्या आनंदात सहभागी हो! नंतर ज्याला एक हजार सोन्याच्या नाण्याच्या थैल्या मिळाल्या होत्या, तो मालकाकडे आला व म्हणाला, मालक, मला माहीत होते की आपण एक कठीण शिस्तीचे मनुष्य आहात. जेथे पेरणी केली नाही तेथे तुम्ही कापणी करता आणि जेथे बी पेरले नाही तेथे पीक घेता. मला आपली भीती होती. म्हणून मी जाऊन तुमच्या एक हजार सोन्याच्या नाण्याच्या थैल्या जमिनीत लपवून ठेवल्या. हे घ्या! हे तुमच्याच आहेत!
मत्तय 25:23-25 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“शाबास! त्याचा धनी म्हणाला, ‘तू चांगला आणि विश्वासू दास आहेस. तू लहान गोष्टीत प्रामाणिक राहिलास, मी तुझी पुष्कळांवर नेमणूक करीन; ये आणि तुझ्या धन्याच्या आनंदात सहभागी हो!’ “नंतर जो सेवक ज्याला एक शिक्का दिला होता, घेऊन पुढे आला. ‘महाराज,’ तो म्हणाला, ‘तुम्ही एक कठोर गृहृस्थ आहात, हे मला माहीत होते. जेथे तुम्ही पेरले नाही तेथून कापणी करता आणि जेथे तुम्ही विखुरले नाही तेथून गोळा करता. मला तुमची भीती वाटली, म्हणून मी गेलो व तुम्ही दिलेला एक शिक्का भूमीत दडवून ठेवला. पाहा, तो आता मी तुम्हाला परत करण्याकरिता आणला आहे.’
मत्तय 25:23-25 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
त्याला त्याच्या धन्याने म्हटले, ‘शाबास, भल्या व विश्वासू दासा, तू थोडक्या गोष्टीत विश्वासू राहिलास, मी तुझी पुष्कळांवर नेमणूक करीन; तू आपल्या धन्याच्या आनंदात सहभागी हो.’ नंतर ज्याला एक हजार मिळाले होते तोही येऊन म्हणाला, ‘महाराज, मी जाणून होतो की, तुम्ही कठोर माणूस आहात; जेथे तुम्ही पेरले नाही तेथे कापणी करता व जेथे पसरून ठेवले नाही तेथून गोळा करता; म्हणून मी भ्यालो व तुमचे हजार रुपये मी जाऊन जमिनीत लपवून ठेवले होते; पाहा, ते तुमचे तुम्हांला मिळाले आहेत.’
मत्तय 25:23-25 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
त्यालाही त्याच्या धन्याने म्हटले, “शाबास, भल्या व विश्वासू दासा, तू थोड्या गोष्टींत विश्वासू राहिलास, मी तुझी पुष्कळांवर नेमणूक करीन, तू तुझ्या धन्याच्या आनंदात सहभागी हो.’ ज्याला एक हजार मोहरा मिळाल्या होत्या तोही येऊन म्हणाला, “महाराज, मी जाणून होतो की, तुम्ही कठोर आहात. जेथे तुम्ही पेरले नाही तेथे कापणी करता व जेथे पसरून ठेवले नाही तेथून गोळा करता. म्हणून मी भ्यालो व जाऊन तुमच्या हजार मोहरा मी जमिनीत लपवून ठेवल्या होत्या. जे तुमचे आहे ते तुम्हांला परत करत आहे.’