मत्तय 24:32-35
मत्तय 24:32-35 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
अंजिराच्या झाडाचा दाखला घ्या; त्याची डाहळी कोमल असता तिला पाने फुटू लागली म्हणजे उन्हाळा जवळ आला असे तुम्ही समजता. तसेच तुम्हीही ह्या सर्व गोष्टी पाहाल तेव्हा तो जवळ, दाराशीच आहे असे समजा. मी तुम्हांला खचीत सांगतो, हे सर्व पूर्ण होईपर्यंत ही पिढी नाहीशी होणारच नाही. आकाश व पृथ्वी नाहीशी होतील परंतु माझी वचने नाहीशी होणारच नाहीत.
मत्तय 24:32-35 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
अंजिराच्या झाडापासून शिका; अंजिराच्या झाडाच्या फांद्या जेव्हा हिरव्या आणि कोवळ्या असतात आणि पाने फुटू लागतात तेव्हा उन्हाळा जवळ आला हे तुम्हास कळते. त्याचप्रमाणे तुम्ही या सर्व गोष्टी पाहाल तेव्हा हे जाणा की, तो दरवाजाजवळ आहे. मी तुम्हास खरे सांगतो, या सर्व गोष्टी पूर्ण होईपर्यंत ही पिढी नाहीशी होणार नाही. आकाश आणि पृथ्वी नाहीशी होतील पण माझी वचने कधीही नष्ट होणार नाहीत.
मत्तय 24:32-35 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“आता अंजिराच्या झाडापासून हा बोध घ्या व शिका. त्या झाडाच्या डाहळ्या कोवळ्या झाल्या आणि त्यांना पालवी फुटू लागली म्हणजे उन्हाळा जवळ आला आहे, हे तुम्ही ओळखता. या सर्व घटना घडत असताना तुम्ही पाहाल, तेव्हा ते अगदी जवळ, दारातच आहे हे समजून घ्या. मी तुम्हाला निश्चित सांगतो की, या सर्वगोष्टी घडून आल्याशिवाय ही पिढी खात्रीने नाहीशी होणार नाही. आकाश व पृथ्वी नाहीशी होतील, पण माझी वचने नाहीशी होणार नाहीत.
मत्तय 24:32-35 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
अंजिराच्या झाडाचा दाखला घ्या; त्याची डाहळी कोमल असता तिला पाने फुटू लागली म्हणजे उन्हाळा जवळ आला असे तुम्ही समजता. तसेच तुम्हीही ह्या सर्व गोष्टी पाहाल तेव्हा तो जवळ, दाराशीच आहे असे समजा. मी तुम्हांला खचीत सांगतो, हे सर्व पूर्ण होईपर्यंत ही पिढी नाहीशी होणारच नाही. आकाश व पृथ्वी नाहीशी होतील परंतु माझी वचने नाहीशी होणारच नाहीत.
मत्तय 24:32-35 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
अंजिराच्या झाडापासून एक दाखला शिकून घ्या. त्याच्या कोवळ्या डाहळ्यांना पालवी फुटू लागली म्हणजे उन्हाळा जवळ आला, हे तुम्हांला कळते. त्याचप्रमाणे ह्या गोष्टी घडत असलेल्या तुम्हांला दिसतील तेव्हा ती वेळ जवळ, अगदी प्रवेशद्वारांशी येऊन ठेपली आहे, हे तुम्हांला कळेल. मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, हे सर्व पूर्ण होईपर्यंत ही पिढी नाहीशी होणार नाही. आकाश व पृथ्वी नष्ट होतील परंतु माझी वचने नष्ट होणार नाहीत.