YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 23:29-36

मत्तय 23:29-36 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

अहो परूश्यांनो, नियमशास्त्राच्या शिक्षकांनो, तुम्ही दुःखी व्हाल. तुम्ही ढोंगी आहात! तुम्ही संदेष्ट्यांच्या कबरा बांधता आणि जे लोक नीतिमान जीवन जगले त्यांच्या कबरा सजवता. आणि तुम्ही म्हणता जर आम्ही आमच्या वाडवडिलांच्या काळात जिवंत असतो तर संदेष्ट्यांच्या रक्तात त्यांचे भागीदार झालो नसतो. पण ज्यांनी ज्यांनी संदेष्ट्यांना जिवे मारले, त्यांचेच तुम्ही वंशज आहात असा स्वतःविषयी पुरावा तुम्ही देता. पुढे व्हा आणि तुमच्या वाडवडिलांनी सुरू केलेली पापी कामे पूर्ण करा. तुम्ही साप व विषारी सापाची पिल्ले आहात. तुम्ही नरकाच्या शिक्षेपासून कसे पळाल? मी तुम्हास सांगतो की मी तुमच्याकडे संदेष्टे, ज्ञानी लोक आणि शिक्षक पाठवत आहे. त्यांच्यातील काहींना तुम्ही जिवे माराल. त्यांपैकी काहींना वधस्तंभावर खिळाल. त्यांच्यातील काहींना तुमच्या सभास्थानात फटके माराल आणि एका नगरातून दुसऱ्या नगरात तुम्ही त्यांचा पाठलाग कराल. म्हणजे नीतिमान हाबेल याच्या रक्तापासून तुम्ही ज्याला वेदी आणि पवित्रस्थान यांच्यामध्ये ठार मारले तो बरख्याचा पुत्र जखऱ्या याच्या रक्तापर्यंत, सर्व नीतिमान लोकांचे रक्त पृथ्वीवर पाडण्यात आले आहे त्यांचा दोष तुमच्यावर यावा. मी तुम्हास खरे सांगतो; या सर्व गोष्टीची शिक्षा तुमच्या पिढीवर येईल.”

सामायिक करा
मत्तय 23 वाचा

मत्तय 23:29-36 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

“अहो परूश्यांनो आणि नियमशास्त्र शिक्षकांनो, अहो ढोंग्यांनो, तुमचा धिक्कार असो. तुम्ही संदेष्ट्यांच्या कबरा बांधता आणि नीतिमानांच्या कबरा सजविता तुम्ही म्हणता, ‘आम्ही आमच्या वाडवडिलांच्या काळात राहत असतो, तर संदेष्ट्यांचे रक्त सांडण्यामध्ये आम्ही त्यांच्याबरोबर कधीही भाग घेतला नसता.’ पण असे बोलताना, तुम्ही स्वतःविरुद्ध साक्ष देता की तुम्ही संदेष्ट्यांचे खून पाडणार्‍या वाडवडिलांची संताने आहात. मग जा आणि जे तुमच्या पूर्वजांनी आरंभिले होते ते पूर्ण करा. “अहो सापांनो! विषारी सापांच्या पिलांनो! नरक-दंडापासून आपली सुटका कशी कराल? यास्तव मी तुमच्याकडे संदेष्टे, ज्ञानी आणि शिक्षक पाठवीत आहे. काहींचा तुम्ही वध कराल आणि क्रूसावर द्याल; काहींना सभागृहात फटके माराल आणि नगरोनगरी त्यांच्या पाठीस लागाल. नीतिमान हाबेलाच्या रक्तापासून मंदिर आणि वेदी यांच्यामध्ये ज्याचा वध तुम्ही केला तो बरख्याचा पुत्र जखर्‍या याच्या रक्तापर्यंत, जे सर्व नीतिमान रक्त पृथ्वीवर पाडण्यात आले त्याचा दोष तुम्हावर येईल. मी तुम्हाला सत्य सांगतो की, तो याच पिढीवर येईल.

सामायिक करा
मत्तय 23 वाचा

मत्तय 23:29-36 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

अहो शास्त्र्यांनो, अहो परूश्यांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही संदेष्ट्यांच्या कबरा बांधता व नीतिमान लोकांची थडगी सजवता; आणि म्हणता, ‘आम्ही आपल्या पूर्वजांच्या काळात असतो तर संदेष्ट्यांचा रक्तपात करण्यात त्यांचे साथीदार झालो नसतो.’ ह्यावरून तुम्ही संदेष्ट्यांचा घात करणार्‍यांचे पुत्र आहात, अशी तुम्ही स्वतःविरुद्ध साक्ष देता. तेव्हा तुम्ही आपल्या पूर्वजांचे माप भरा. अहो सापांनो, सापांच्या पिलांनो, तुम्ही नरकदंड कसा चुकवाल? म्हणून पाहा, मी तुमच्याकडे संदेष्टे, ज्ञानी व शास्त्री ह्यांना पाठवतो; तुम्ही त्यांच्यातील कित्येकांना जिवे माराल व वधस्तंभावर खिळाल आणि कित्येकांना तुम्ही आपल्या सभास्थानांमध्ये फटके माराल व नगरोनगरी त्यांचा पाठलाग कराल; ह्यासाठी की, नीतिमान हाबेल ह्याच्या रक्तापासून वेदी व पवित्रस्थान ह्यांच्यामध्ये ज्याला तुम्ही जिवे मारले तो बरख्याचा पुत्र जखर्‍या ह्याच्या रक्तापर्यंत, सर्व नीतिमान लोकांचे जे रक्त पृथ्वीवर पाडण्यात आले आहे त्याचा दोष तुमच्यावर यावा. मी तुम्हांला खचीत सांगतो, ह्या सर्व गोष्टी ह्या पिढीवर येतील.

सामायिक करा
मत्तय 23 वाचा

मत्तय 23:29-36 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

अहो शास्त्र्यांनो आणि परुश्यांनो, अहो ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! तुम्ही संदेष्ट्यांच्या कबरी बांधता व नीतिमान लोकांची थडगी सजवता आणि दावा करता, “आम्ही आमच्या पूर्वजांच्या काळात असतो, तर संदेष्ट्यांचा रक्तपात करण्यात त्यांचे साथीदार झालो नसतो.’ ह्यामुळे तुम्ही संदेष्ट्यांचा घात करणाऱ्यांचे वंशज आहात, अशी स्वतःविरुद्ध साक्ष देता. तर मग, तुमच्या पूर्वजांचे कृत्य तुम्ही पूर्ण करा. अहो सापांनो आणि सापांच्या पिलांनो, तुम्ही नरकदंड कसा चुकवाल? पाहा, मी तुमच्याकडे संदेष्टे, ज्ञानी व शास्त्री ह्यांना पाठवतो, तुम्ही त्यांच्यातील काही जणांना ठार माराल व क्रुसावर खिळाल आणि इतरांना तुम्ही तुमच्या सभास्थानांत फटके माराल व नगरोनगरी त्यांचा पाठलाग कराल. म्हणून नीतिमान हाबेल ह्याच्या रक्तापासून वेदी व पवित्र स्थान ह्यांच्यामध्ये ज्याला तुम्ही ठार मारले तो बरख्याचा पुत्र जखऱ्या ह्याच्या रक्तापर्यंत, सर्व नीतिमान लोकांचे जे रक्त पृथ्वीवर सांडण्यात आले आहे, त्याचा दोष तुमच्यावर येईल. मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, ह्या सर्व कृत्यांची शिक्षा आजच्या पिढीला भोगावी लागेल.

सामायिक करा
मत्तय 23 वाचा