मत्तय 22:35-39
मत्तय 22:35-39 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
एक परूशी नियमशास्त्राचा जाणकार होत, त्याने त्याची परीक्षा पाहावी म्हणून प्रश्न केला. त्याने विचारले, “गुरूजी, नियमशास्त्रातील कोणती आज्ञा सर्वांत महत्त्वाची आहे?” येशूने उत्तर दिले, “‘प्रभू आपला देव याजवर तू आपल्या पूर्ण अंतःकरणाने, आपल्या पूर्ण जिवाने, आपल्या पूर्ण मनाने प्रीती कर.’ ही पहिली आणि मोठी आज्ञा आहे. हिच्यासारखी दुसरी एक आहे ‘जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर.’
मत्तय 22:35-39 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
कोणी एक नियमशास्त्र तज्ञ आला व त्यांची परीक्षा पाहण्याकरिता त्यांना हा प्रश्न विचारला: “गुरुजी, मोशेच्या नियमशास्त्रानुसार सर्वात मोठी आज्ञा कोणती आहे?” येशूंनी उत्तर दिले, “ ‘तुमचा प्रभू परमेश्वर यांच्यावर तुमच्या पूर्ण अंतःकरणाने आणि तुमच्या पूर्ण जिवाने आणि तुमच्या पूर्ण मनाने प्रीती केली पाहिजे.’ हीच सर्वात पहिली आणि महान आज्ञा आहे. यासारखीच दुसरी ही आहे: ‘जशी स्वतःवर तशी तुमच्या शेजार्यावर प्रीती करा.’
मत्तय 22:35-39 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
आणि त्यांच्यातील एका शास्त्र्याने त्याची परीक्षा पाहण्याकरता विचारले, “गुरूजी, नियमशास्त्रातील कोणती आज्ञा मोठी आहे?” येशू त्याला म्हणाला, “‘तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जिवाने व पूर्ण मनाने प्रीती कर.’ हीच मोठी व पहिली आज्ञा आहे. हिच्यासारखी दुसरी ही आहे की, ‘तू आपल्या शेजार्यावर स्वतःसारखी प्रीती कर.’
मत्तय 22:35-39 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
त्यांच्यातील एका तज्ज्ञाने त्याची परीक्षा पाहण्याकरता विचारले, “गुरुजी, नियमशास्त्रातील महान आज्ञा कोणती?” येशूने उत्तर दिले, “‘तू आपला प्रभू परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण अंतःकरणाने, संपूर्ण जिवाने व संपूर्ण मनाने प्रीती कर.’ ही महान व पहिली आज्ञा आहे. हिच्यासारखी दुसरी महत्त्वपूर्ण आज्ञा ही आहे, “तू जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर.’