YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 22:1-22

मत्तय 22:1-22 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

येशू त्यांच्याशी पुन्हा एकदा दाखल्यांनी बोलला, त्यास उत्तर देऊन म्हणाला, “स्वर्गाचे राज्य एका राजासारखे आहे, त्याने त्याच्या मुलाच्या लग्नानिमित्त भोजनाचे आमंत्रण दिले. त्याने त्याच्या चाकरांना पाठवून, ज्यांना लग्नाचे आमंत्रण होते अशांना बोलाविण्यास सांगितले. पण लोकांनी राजाच्या मेजवानीस येण्यास नकार दिला. नंतर राजाने आणखी काही चाकरांना पाठवून दिले, राजा चाकरांना म्हणाला, मी त्या लोकांस अगोदरच आमंत्रण दिले आहे म्हणून आता जा आणि त्यांना सांगा, पाहा, मेजवानी तयार आहे, मी माझे चांगल्यातील चांगले बैल आणि वासरे कापली आहेत आणि सगळे तयार आहे, लग्नाच्या मेजवानीस या. चाकर गेले आणि त्यांनी लोकांस येण्यास सांगितले, पण त्यांनी चाकरांकडे लक्ष दिले नाही. ते आपापल्या कामास निघून गेले. एक शेतात काम करायला गेला, तर दुसरा व्यापार करायला गेला. काहीनी चाकरांना पकडून अपमान केला व त्यास जिवे मारले. राजा फार रागावला. त्याने त्याचे सैन्य पाठवले आणि त्यांनी त्या खुन्यांना ठार मारले. त्यांनी त्यांचे शहर जाळले. मग राजा त्याच्या चाकरांना म्हणाला, मेजवानी तयार आहे, पण ज्यांना बोलावले होते ते लायक नव्हते, म्हणून रस्त्यांच्या कोपऱ्यावर जा आणि तेथे तुम्हास जे भेटतील त्यांना लग्नाच्या मेजवानीला बोलवा. मग ते चाकर रस्त्यावर गेले. त्यांना जे जे लोक भेटले त्यांना जमा केले. ज्याठिकाणी लग्नाची मेजवानी तयार होती तेथे चाकरांनी चांगल्या आणि वाईट लोकांस जमा केले आणि लग्नाचा मंडप पाहुण्यांनी भरून गेला. मग त्या सर्वांना भेटण्यास राजा तेथे आला. लग्नाचा पोशाख न केलेला एक मनुष्य राजाला तेथे आढळला. राजा त्यास म्हणाला, मित्रा, तू लग्नाचा पोशाख न घालता तू येथे कसा आलास? पण त्यास काही उत्तर देता येईना. तेव्हा राजाने चाकरांना सांगितले, या मनुष्याचे हात व पाय बांधा आणि त्यास बाहेर अंधारात टाका, तेथे रडणे आणि दात खाणे चालेल. कारण बोलावलेले पुष्कळ आहेत पण निवडलेले थोडके आहेत.” मग परूशी गेले आणि येशूला कसे पकडावे याचा कट करू लागले. त्यास शब्दात पकडण्याचा प्रयत्न करू लागले. परूश्यांनी त्यांचे शिष्य हेरोद्यांसह त्याच्याकडे पाठवून. ते म्हणाले, “गुरुजी, आम्हास माहीत आहे की आपण खरे आहात आणि तुम्ही देवाचा मार्ग खरेपणाने शिकवता व दुसरे काय विचार करतात याची तुम्ही पर्वा करीत नाही आणि तुम्ही लोकांमध्ये पक्षपात दाखवत नाही. म्हणून तुमचे मत आम्हास सांगा, कैसराला कर देणे योग्य आहे की नाही?” येशूला त्यांचा दुष्ट उद्देश माहीत होता, म्हणून तो म्हणाला, “ढोंग्यांनो, तुम्ही माझी परीक्षा का घेत आहात? कर भरण्यासाठी जे नाणे वापरले जाते ते मला दाखवा.” त्या लोकांनी येशूला चांदीचे एक नाणे दाखविले. तेव्हा येशूने विचारले, “या नाण्यावर कोणाचे चित्र आणि नाव लिहिलेले आहे?” त्या लोकांनी उत्तर दिले, “कैसराचे.” यावर येशू त्यांना म्हणाला, “जे कैसराचे आहे ते कैसराला द्या आणि जे देवाचे आहे ते देवाला द्या.” येशू जे म्हणाला ते त्या लोकांनी ऐकले तेव्हा ते आश्चर्यचकित झाले आणि तेथून निघून गेले.

सामायिक करा
मत्तय 22 वाचा

मत्तय 22:1-22 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

येशूंनी परत त्यांना दाखला सांगितला: ते म्हणाले, “स्वर्गाचे राज्य, एका राजासारखे आहे ज्याने आपल्या मुलाच्या विवाह निमित्ताने मेजवानी तयार केली. ज्यांना आमंत्रित केले होते त्या सर्वांस मेजवानीसाठी यावे म्हणून राजाने दासांना त्यांच्याकडे पाठविले. पण त्यांनी मेजवानीस येण्याचे नाकारले. “तेव्हा त्याने आणखी काही दास पाठविले, ‘ज्यांना आमंत्रित केले आहे त्यांना सांगा की मी मेजवानी तयार केली आहे, माझे बैल आणि पुष्ट गुरे कापली आहेत आणि सर्वकाही तयार आहे. लग्नाच्या मेजवानीस या.’ “परंतु त्यांनी मुळीच लक्ष दिले नाही आणि एकजण आपल्या शेतावर, तर दुसरा आपल्या व्यापारासाठी निघून गेला. बाकीच्या आमंत्रितांनी तर राजाच्या दासांना पकडले, अपमानित वागणूक दिली आणि ठारही मारले. राजाला खूपच राग आला. त्याने आपले सैन्य पाठवून दासांना ठार करणार्‍यांचा नाश केला. त्यांची शहरे जाळून टाकली. “यानंतर राजा आपल्या दासांना म्हणाला, ‘लग्नाची मेजवानी तयार आहे, पण ज्यांना मी आमंत्रण दिले ते लोक या बहुमानास पात्र नाहीत. तेव्हा तुम्ही रस्त्यांच्या चौकामध्ये जा आणि तिथे जे दिसतील, त्यांना मेजवानीस घेऊन या.’ राजाच्या आज्ञेप्रमाणे दास बाहेर गेले आणि चांगले वाईट, असे जे कोणी त्यांना रस्त्यांत सापडले, त्या सर्वांना ते मेजवानीस घेऊन आले आणि मेजवानीचा कक्ष आमंत्रितांनी भरून गेला. “राजा पाहुणे मंडळीस भेटावयास आला, त्यावेळी एक मनुष्य विवाहोत्सवाचा पोशाख न घालताच आलेला दिसला. राजाने त्या मनुष्याला विचारले, ‘मित्रा, लग्नाच्या पोषाखाशिवाय तू आत कसा आलास?’ तो मनुष्य स्तब्ध झाला. “मग राजा आपल्या नोकरास म्हणाला, ‘या मनुष्याचे हातपाय बांधा आणि त्याला बाहेरच्या अंधारात फेकून द्या. त्या ठिकाणी रडणे आणि दातखाणे चालेल.’ “कारण बोलावलेले पुष्कळ आहेत, पण निवडलेले थोडके आहेत.” मग परूशी लोक बाहेर गेले आणि येशूंना त्यांच्या बोलण्यात कसे पकडावे यासंबंधी चर्चा केली. त्यानुसार परूश्यांनी आपल्या काही शिष्यांना हेरोदी गटाच्या लोकांबरोबर येशूंकडे पाठविले व म्हणाले, “गुरुजी, तुम्ही प्रामाणिक व्यक्ती आहात, हे आम्हाला माहीत आहे. तुम्ही कोणाचे समर्थन करीत नाही, कोणाची पर्वा न करता खरेपणाने परमेश्वराचा मार्ग शिकविता आणि भेदभाव न करता, ते कोण आहेत याकडे लक्ष देत नाहीत. तर आता आम्हाला हे सांगा की, कैसराला कर देणे योग्य आहे की नाही?” पण त्यांचा हेतू काय आहे हे येशूंनी ओळखले. “अहो, ढोंग्यांनो,” येशू म्हणाले, “मला सापळ्यात पाडू पाहता काय? कर भरण्यासाठी वापरलेले एक नाणे मला दाखवा.” आणि त्यांनी त्यांना दिनारचे एक नाणे दाखविले. येशूंनी त्यांना विचारले, “या नाण्यावर कोणाचा मुखवटा आणि कोणाचा लेख आहे?” “कैसराचे!” त्यांनी उत्तर दिले. “मग,” येशू म्हणाले, “जे कैसराचे आहे, ते कैसराला द्या आणि जे परमेश्वराचे आहे ते परमेश्वराला द्या.” त्यांच्या उत्तराने ते आश्चर्यचकित झाले आणि मग ते त्यांना सोडून निघून गेले.

सामायिक करा
मत्तय 22 वाचा

मत्तय 22:1-22 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

येशू पुन्हा त्यांच्याशी दाखले देऊन बोलू लागला : “स्वर्गाचे राज्य कोणाएका राजासारखे आहे; त्याने आपल्या पुत्राच्या लग्नाची मेजवानी दिली; आणि लग्नाच्या मेजवानीस ज्यांना आमंत्रण दिले होते, त्यांना बोलावण्याकरता त्याने आपले दास पाठवले; परंतु ते येईनात. पुन्हा त्याने दुसरे दास पाठवले व त्यांना म्हटले की, ‘आमंत्रितांना असे सांगा, पाहा, मी जेवण तयार केले आहे; माझे बैल व पुष्ट पशू कापले आहेत, सर्व सिद्ध आहे, लग्नाच्या मेजवानीस चला.’ तरी ते मनावर न घेता ते कोणी आपल्या शेताला, कोणी व्यापाराला गेले, आणि बाकीच्यांनी त्याच्या दासांना धरून त्यांचा अपमान केला व त्यांना जिवे मारले. तेव्हा राजाला राग आला आणि त्याने आपले सैनिक पाठवून त्या घातक्यांचा नाश केला व त्यांचे नगर जाळून टाकले. मग तो आपल्या दासांना म्हणाला, ‘लग्नाची तयारी आहे खरी, परंतु आमंत्रित लायकीचे नव्हते. म्हणून तुम्ही चवाठ्यांवर जाऊन जितके तुम्हांला आढळतील तितक्यांना लग्नाच्या मेजवानीस बोलवा.’ मग त्या दासांनी रस्त्यांवर जाऊन बरेवाईट असे जितके त्यांना आढळले त्या सर्वांना एकत्र जमवले आणि लग्नाचा मांडव जेवणार्‍यांनी भरून गेला. मग राजा जेवणार्‍यांना पाहण्यास आत आला, तेव्हा लग्नाचा पोशाख न घातलेला असा एक माणूस त्याच्या दृष्टीस पडला. त्याला तो म्हणाला, ‘मित्रा, तू लग्नाचा पोशाख न घालता येथे कसा शिरलास?’ त्याला काही उत्तर देता येईना. तेव्हा राजाने चाकरांना सांगितले, ‘ह्याचे हातपाय बांधून ह्याला घेऊन जा व बाहेरील अंधारात टाका, तेथे रडणे व दात खाणे चालेल.’ कारण बोलावलेले पुष्कळ आहेत, पण निवडलेले थोडके आहेत.” नंतर परूश्यांनी जाऊन त्याला बोलण्यात कसे पकडावे ह्याविषयी मसलत केली. त्यांनी आपल्या शिष्यांना हेरोद्यांसह त्याच्याकडे पाठवून म्हटले, “गुरूजी आम्हांला ठाऊक आहे की, आपण खरे आहात, परमेश्वराचा मार्ग खरेपणाने शिकवता व कोणाची भीड धरत नाही; कारण आपण तोंड पाहून बोलत नाही. आपल्याला काय वाटते हे आम्हांला सांगा, कैसराला कर देणे योग्य आहे की नाही?” येशू त्यांचे दुष्टपण ओळखून म्हणाला, “अहो ढोंग्यांनो, माझी परीक्षा कशाला पाहता? कराचे नाणे मला दाखवा.” तेव्हा त्यांनी त्याच्याजवळ एक रुपया दिला. त्याने त्यांना म्हटले, “हा मुखवटा व हा लेख कोणाचा?” ते म्हणाले, “कैसराचा.” तेव्हा त्याने त्यांना म्हटले, “तर मग कैसराचे ते कैसराला आणि देवाचे ते देवाला भरून द्या.” हे ऐकून ते थक्‍क झाले व त्याला सोडून गेले.

सामायिक करा
मत्तय 22 वाचा

मत्तय 22:1-22 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

येशू पुन्हा त्यांना दाखले देऊ लागला. तो म्हणाला, “स्वर्गाचे राज्य एका राजासारखे आहे. त्याने आपल्या पुत्राच्या लग्नाची मेजवानी द्यायचे ठरवले. लग्नाच्या मेजवानीस ज्यांना आमंत्रण दिले होते, त्यांना बोलावायला त्याने आपले दास पाठवले, परंतु ते येईनात. पुन्हा त्याने दुसरे दास पाठवले व त्यांना म्हटले की, आमंत्रितांना असे सांगा, “पाहा, मी मेजवानी तयार केली आहे, माझे बैल व पुष्ट पशू कापले आहेत. सर्व काही तयार आहे. लग्नाच्या मेजवानीस चला.’ तरी पण हे मनावर न घेता त्यांच्यापैकी कोणी आपल्या शेतात, तर कोणी व्यापाराला गेले. बाकीच्यांनी त्याच्या दासांना धरून त्यांचा अपमान केला व त्यांना ठार मारले. हे ऐकून राजा संतापला आणि त्याने आपले सैनिक पाठवून त्या घातक्यांचा नाश केला व त्यांचे शहर जाळून टाकले. त्यानंतर तो आपल्या दासांना म्हणाला, “लग्नाची तयारी झाली आहे खरी, परंतु आमंत्रित लायकीचे नव्हते. म्हणून तुम्ही चव्हाट्यावर जा. तेथे जितके लोक तुम्हांला आढळतील, तितक्यांना लग्नाच्या मेजवानीला बोलवा.’ त्या दासांनी रस्त्यावर जाऊन बरेबाईट असे जितके आढळले, त्या सर्वांना एकत्र जमवले आणि लग्नाचा मंडप लोकांनी भरून गेला. परंतु राजा पाहुण्यांना भेटायला आला तेव्हा लग्नसमारंभास साजेसे कपडे न घातलेला असा एक माणूस त्याच्या दृष्टीस पडला. तो त्याला म्हणाला, “मित्रा, लग्नाचा पोषाख न घालता तू येथे कसा आलास?’ त्याला काही उत्तर देता येईना. नंतर राजाने नोकरांना सांगितले, “ह्याचे हातपाय बांधून ह्याला बाहेरील अंधारात टाका, तेथे आक्रोश केला जाईल व दात ओठ खाणे चालेल.’ बोलावलेले पुष्कळ आहेत, पण निवडलेले थोडे आहेत.” नंतर येशूला बोलण्यात पकडण्याकरता परुश्यांनी मसलत केली. त्यांनी त्यांच्या शिष्यांना व हेरोदच्या पक्षातील काही जणांना त्याच्याकडे पाठवून विचारले, “गुरुजी, आम्हांला ठाऊक आहे की, आपण खरे आहात आणि सत्याला अनुसरून देवाचा मार्ग शिकवता. आपण कोणाची भीड बाळगत नाही आणि व्यक्तीचे तोंड पाहून बोलत नाही. आपल्याला काय वाटते, हे आम्हांला सांगा. कैसरला कर देणे कायदेशीर आहे की नाही?” येशू त्यांचा दुष्टपणा ओळखून म्हणाला, “ढोंग्यांनो, माझी अशी परीक्षा का पाहता? कर भरायचे नाणे मला दाखवा.” तेव्हा त्यांनी त्याच्याजवळ एक नाणे दिले. तो त्यांना म्हणाला, “ही मुद्रा व हा लेख कोणाचा?” ते म्हणाले, “कैसरचा.” त्याने त्यांना म्हटले, “तर मग कैसरचे ते कैसराला व देवाचे ते देवाला द्या.” हे ऐकून ते थक्क झाले व त्याला सोडून निघून गेले.

सामायिक करा
मत्तय 22 वाचा